Zilla Parishad Election 2026 LIVE: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू... पाहा, मतदानाची LIVE टक्केवारी

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले असून निवडणूकीसंदर्भात प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.

Mumbai Tak

मुंबई तक

07 Feb 2026 (अपडेटेड: 07 Feb 2026, 04:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाला सुरूवात...

point

पाहा, प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स

 Zilla Parishad Panchayat Samiti Election 2026 Voting LIVE : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांची आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आज म्हणजेच 7 फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून 9 फेब्रुवारी या निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणूकीसंदर्भात प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या.  

हे वाचलं का?

- सिंधुदुर्ग 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेतीन वाजेपर्यंत सरासरी 50.10  टक्के मतदान

- सातारा

दुपारी 3.30 पर्यंत सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान: 52.20 टक्के 

टक्केवारी - 52.20

- सोलापूर 

सोलापूर जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 1.30 वाजेपर्यंत : 33.37 टक्के मतदान 

- लातूर 

लातूरमध्ये दुपारी 1.30 वाजेपर्यंत 35.94 टक्के मतदान

- सांगली 

दुपारी 1.30 पर्यंत मतदानाची आकडेवारी : 36.01 टक्के 

- मावळ

मावळमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दुपारी 01:30 पर्यंत मतदान टक्केवारी: 42.11 टक्के मतदान 

- छत्रपती संभाजी

छत्रपती संभाजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी 1.30 पर्यंत मतदान टक्केवारी : 35.23 टक्के मतदान

- पुणे

सकाळी 11.30 पर्यंत पुणे जिल्हा परिषद मतदानाची टक्केवारी : 21.16 टक्के 

जुन्नर - 21.7 टक्के 
आंबेगाव - 22.19 टक्के 
शिरूर - 21.37 टक्के  
खेड - 21.82 टक्के 
मावळ - 24.54 टक्के 
मुळशी - 18.49 टक्के 
हवेली - 19.85 टक्के 
दौंड - 21.63 टक्के 
पुरंदर - 21.51 टक्के 
वेल्हे - 22.14 टक्के 
भोर - 23.93 टक्के 
बारामती - 18.21 टक्के 
इंदापूर - 20.57 टक्के 

- सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11.30 वाजेपर्यंत सरासरी 25.72 टक्के मतदान 

- रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 11.30 वाजेपर्यंत सरासरी 27 टक्के मतदान

- नागरिकांचा जिल्हा परिषद मतदानावर बहिष्कार 

सांगली जिल्हा परिषदेच्या बुधगाव गटातील माधवनगर येथील विस्तारित अष्टविनायक कॉलनी मध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता या सारख्या नागरी सुविधा मिळत नसल्याचे निषेधार्थ, येथील नागरिकांनी शनिवारी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

- परभणी 

परभणीत 11:30 पर्यंत 22 टक्के मतदान

- कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत 11.30 वाजेपर्यंतची आकडेवारी :  26:76 टक्के मतदान......

- सातारा 

सातारा जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत मतदानाची सरासरी आकडेवारी : 22.05 टक्के

- सोलापूर 

सोलापूर जिल्ह्यात सकाळी 11.30 पर्यंत मतदानाची आकडेवारी : 19.06 टक्के

- लातूर

सकाळी 11.30 वाजेपर्यंत 21.5 टक्के मतदान

- छत्रपती संभाजीनगर 

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 7.30 ते 11.30 ची मतदानाची टक्केवारी : 22.02 टक्के 

- चिपळूण 

चिपळूणमध्ये सकाळी 11:30 पर्यंत 25.14 टक्के मतदान 

- गुहागर 

गुहागरमध्ये सकाळी 11:30 पर्यंत 24.23 टक्के मतदान  

- मंडणगड 

मंडणगडमध्ये सकाळी 11:30 पर्यंत 24.23 टक्के मतदान 

- दापोली 

दापोलीत सकाळी 11:30 पर्यंत 26.75 टक्के मतदान 

- मावळ

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सकाळी 07:30 ते 11:30 पर्यंत 24.45 टक्के मतदान

- सांगली 

सांगली जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 11.30 ची मतदान आकडेवारी : 20.30 टक्के 

सातारा 

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते 9.30 या पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी 6.78 टक्के मतदान झाले आहे.

- धाराशिव

धाराशिवमधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना शांततेत सुरुवात; पहिल्या दोन तासांत 7.47 टक्के मतदान

- राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सकाळी 9.30 वाजेपर्यंत 7.80 टक्के मतदान झाले.

- खेड तालुका 

खेड तालुक्यात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत : 10.46 टक्के मतदान 

- मंडणगड तालुका 

मंडणगड तालुक्यात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत : 9.31 टक्के मतदान 

- संगमेश्वर तालुका 

संगमेश्वर तालुक्यात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत : 10.42 टक्के मतदान 

- कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत : 10:68 टक्के मतदान

- छत्रपती संभाजीनगर

जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 9 तालुक्यात सरासरी 7.65 टक्के मतदान  

फुलंब्री 7.75 
सोयगाव 9.01
संभाजीनगर 8.64
खुलताबाद 5.06
गंगापूर 8.31
पैठण 6.95

- पुण्यातील मावळमध्ये मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद  

मावळमध्ये सकाळी 07:30 ते 09:30 पर्यंत: 8.63 टक्के मतदान 

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 15 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५5तर पंचायत समितीच्या 10 जागांचा समावेश आहे. 

- सिंधुदुर्ग

जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात तब्बल ९ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असून ८१० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.

- पैसे वाटपावरून मोठा गोंधळ; भाजप–राष्ट्रवादी आमनेसामने

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड जिल्हा परिषद गटात मतदारांना पैसे वाटपावरून मोठा राडा झाला आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

- परभणी 

परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 54 गटासाठी  तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी ही निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

- निवडणूक प्रक्रियेत पुन्हा शाईचा वापर 

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक प्रक्रियेत पुन्हा शाईचा वापर करण्यात येत आहे. महापालिकेत मार्कर पेनने लावलेली शाई पुसल्याचे प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक विभागाचा निर्णय 

- कोल्हापूर 

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान उत्साहात सुरू झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.