Devendra Fadnavis on Ajit Pawar, Mumbai : "एकसंध राष्ट्रवादी असताना सलग तीन वेळेस अजित पवारांना वेगवेगळ्या पद्धतीने पुढे करुन तोंडावर पाडण्यात आलं, हेच अजित पवारांचं राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचं कारण आहे. शरद पवारांनी अजितदादांचा युज अँड थ्रो केला, असं म्हणणे योग्य होणार नाही. कारण त्यांचं नातं काय आहे आपल्याला माहिती आहे. पण परिस्थिती तशीच आहे", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ADVERTISEMENT
2019 मध्ये आमच्यासोबत येण्याचा निर्णय शरद पवारांचा होता, अजितदादांचा नाही - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार 2019 साली पूर्णपणे आमच्यासोबत होते. आमच्यासोबत येण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. पण नंतर त्यांनी शब्द बदलला. निर्णय बदलणारे शरद पवार होते. मात्र, आमच्यासोबत येण्याचा निर्णय हा शरद पवारांचा होता. तो निर्णय अजित पवारांचा नव्हता. शरद पवारांनीच निर्णय घेतला आणि नंतर ते बदलले. त्यांची स्ट्रॅटेजी काय होती ? हे त्यांनाच माहिती असेल. मला वाटतं की, सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यास तयार आहोत, असं शरद पवारांना सांगितलं. त्यानंतर शरद पवारांना वाटलं दुसरा पर्याय खुला झालाय. भाजपसोबत गेलो तर देवेंद्र फडणवीस इथे त्यांचा नेता आहे. त्यांच्यावर अमित शाह आहेत, नरेंद्र मोदी हे वरीष्ठ नेते आहेत. मी जर उद्धव ठाकरेंसोबत गेलो तर सरकार माझ्या हातात राहिल. त्यामुळे शरद पवारांनी निर्णय बदलला. तरी देखील अजित पवार आमच्यासोबत आले. मात्र, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर अजित पवारांचा आमच्यासोबत राहाण्याचा प्रश्नच राहिला नव्हता. आम्ही त्यांना म्हणालो, तुम्ही परत जा. कारण त्यांचंही राजकारणातील अस्तित्व राहायला हवं. आम्ही त्यांना अस्तित्वहीन करु इच्छित नव्हतो. त्यामुळे ते परत गेले. यामध्ये अजित पवारांची कोणतीही चूक नव्हती, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस आणि भाजप एकत्र येणे सोडून राजकारणात काहीही होऊ शकतं. मी कधीकाळी म्हणालो होतो की, जग इकडंच तिकडं होऊ द्या, आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करणार नाहीत. मात्र, परिस्थिती अशी आली की, त्यांच्यासोबत जावं लागलं. सध्या आम्ही एवढे स्ट्राँग आहोत की, शरद पवारांच्या गटाला सोबत घेण्याची गरज नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











