Eknath Shinde : मिलिंद नार्वेकरांना लोकसभा लढवण्याची ऑफर दिलीये का? शिंदे म्हणाले...

मुंबई तक

• 10:43 AM • 22 Apr 2024

Eknath Shinde Milind Narvekar offer : मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेकडून ऑफर देण्यात आल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.

मिलिंद नार्वेकर यांना शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीची ऑफर, शिंदेंनी काय सांगितलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर.

follow google news

Milind Narvekar Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात रविवारी (२१ एप्रिल) खळबळ उडाली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. 

हे वाचलं का?

महायुतीत मुंबईतील काही जागांबद्दलचा पेच सुटलेला नाही. काही मतदारसंघात उमेदवाराचा प्रश्नही उभा ठाकला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांचाही शोध घेतला जात आहे. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर यांचे नावे समोर आले. 

दक्षिण मुंबईतून मिलिंद नार्वेकरांना ऑफर?

अचानक चर्चा सुरू झाली की, उद्धव ठाकरे यांचे जवळचे मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी याबद्दल कोणतीही भूमिका मांडली नाही. पण, एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत यावर उत्तर दिले.

हेही वाचा >> "...त्यावेळी उभं करू नका; सांगा अजित पवार चले जाव" 

एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना मिलिंद नार्वेकर यांना दिलेल्या ऑफरबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी काय उत्तर दिले वाचा...

हेही वाचा >> "काँग्रेसची नजर आता माता भगिनींच्या मंगळसूत्रावर", मोदींवर गांधींसह विरोधक संतापले

एकनाथ शिंदे म्हणाले, "हे खरं नाही. ही अफवा आहे. आम्ही त्यांना कोणतीही ऑफर दिलेली नाही", असे स्पष्ट करत मुख्यमंत्री शिंदेंनी या चर्चेला पूर्णविराम दिला. या मुलाखतीत आपण ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> "मुलाला पुढे आणण्यासाठी ठाकरेंना घरात कोंडून ठेवलं", खळबळजनक विधान 

त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल शिंदेंनी महत्त्वाची माहिती दिली. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. त्याचबरोबर काही राज्य सरकारच्या मंडळांच्या आणि सहकारी संस्थांच्या नियुक्त्याही केल्या जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

    follow whatsapp