PM Modi : "काँग्रेसची नजर आता माता भगिनींच्या मंगळसूत्रावर", मोदींवर गांधींसह विरोधक संतापले

मुंबई तक

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील एका मुद्द्यावर बोट ठेवलं. सर्वांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून, ती एकत्रित करून मुस्लिमांना वाटायची आहे, असे मोदी म्हणाले. त्यांच्या याच विधानावरून आता वाद उभा राहिला आहे.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी
पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर राहुल गांधी यांची टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदींची टीका

point

राहुल गांधींनी दिले प्रत्युत्तर

point

असदुद्दीन ओवेसीची पंतप्रधान मोदींवर टीका

PM Modi On Congress Manifesto Property Distribution : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणामुळे काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधक चांगलेच संतापले. पंतप्रधान मोदींची राजस्थानमधील बांसवाडा येथे सभा झाली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विधानाशी या जाहीरनाम्यातील घोषणाचा संबंध लावत मोदी म्हणाले की, 'काँग्रेस सत्तेत आल्यास सगळ्यांच्या संपत्तींचा सर्वेक्षण केले जाईल आणि ही संपत्ती ते मुस्लिमांना वाटणार.' यावरून काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले असून, मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. (uproar over pm modi's Remarks about distribution of property in congress manifesto) 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस अर्बन नक्षल्यांच्या हातात गेली आहे, असे त्यांचेच लोक सांगत आहेत, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील देशातील सर्व संपत्तीचे सर्वेक्षण करून त्याचे समान वाटप करण्याबद्दलच्या मुद्द्यावर मोदींनी भाष्य केले. 

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

भाषणात  मोदी म्हणाले की, "यावेळचा काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसने जाहीरनाम्यात जे सांगितलं आहे, ते चिंताजनक आहे. गंभीर आहे. आणि हा माओवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर काँग्रेसचे सरकार आले, तर प्रत्येकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केले जाईल. आपल्या बहिणींकडे किती सोने आहे, ते तपासलं जाईल. त्याचा हिशोब केला जाईल."

"आदिवासी कुटुंबाकडे चांदी असते, त्याचा हिशोब केला जाईल. सरकारी नोकरदारांकडे किती संपत्ती आहे, त्याची चौकशी केली जाईल. इतकंच नाही, पुढे काय म्हटलं आहे की, बहिणींकडचे जे सोने आहे आणि इतर जी संपत्ती, ती सगळ्यांना समान पद्धतीने वाटली जाईल."

हे वाचलं का?

    follow whatsapp