एकनाथ शिंदेंना विलंब, पण बोर्डे कुटुंबासाठी ठरलं वरदान! किडनी ट्रान्सप्लांटसाठी कशी झाली मदत?

मुंबई तक

08 Jun 2025 (अपडेटेड: 08 Jun 2025, 09:59 AM)

विमान सुटल्यामुळे बोर्डे या जळगाव विमानतळावर अडकल्या होत्या. शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना त्यांची परिस्थिती कळली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदे यांच्या विमानाला उशीर

point

वैमानिकाने नकार दिल्यामुळे झाला विलंब

point

हाच विलंब बोर्डे कुटुंबासाठी वरदान ठरला

Eknath Shinde Jalgaon : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव विमानतळावर तब्बल तासभर प्रतीक्षा करावी लागली. राज्यभर या घटनेची चर्चा झाली. कारण घडलं असं की, विमान निर्धारित वेळेच्या बराच उशिरा, रात्री 9:15 वाजता विमानतळावर पोहोचलं. उशीर आल्याने आणि त्याची ड्युटी संपल्याचं कारण देत वैमानिकाने उड्डाणास नकार दिला. यानंतर, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वैमानिकाशी 45 मिनिटं बंद खोलीत चर्चा केली. अखेर, विमानाने उड्डाण केलं.

हे वाचलं का?

विलंब ठरला वरदान

एकनाथ शिंदे यांना निघण्यासाठी उशीर झाला, पण हाच उशीर एका कुटुंबासाठी वरदान ठरला. कारण या उशिरामुळे एका महिलेसाठी अनपेक्षितपणे मदत मिळाली. शीतल बोर्डे या महिलेला तातडीच्या किडनी उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज होती. पण त्याचं नियोजित विमान त्यांना पकडता आलं नव्हतं. ते विमान निघून गेलं होतं.

विमान सुटल्यामुळे बोर्डे या जळगाव विमानतळावर अडकल्या होत्या. शिंदे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना त्यांची परिस्थिती कळली. त्यांनी तातडीने शीतल पाटील  आणि त्यांच्या पतीसाठी शिंदे यांच्या विमानाने मुंबईला जाण्याची व्यवस्था केली.

हे ही वाचा >>घरात वाद झाला आणि मुलाने थेट आईलाच भोसकलं... नागपूरमधील चीड आणणारी घटना

दरम्यान, या घटनेबद्दल बोलताना गिरीश महाजन यांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितलं, "एकनाथ शिंदे यांनी आपले संघर्षाचे दिवस विसरले नाहीत. त्यांनी सामान्य माणसाप्रती मोठी संवेदनशीलता दाखवली आहे." हा प्रसंग शिंदे यांच्या संवेदनशीलतेचे आणि प्रशासनाच्या तत्परतेचे उदाहरण ठरला आहे. दुसरीकडे शीतल आणि त्यांच्या पतीच्या आयुष्यातला न विसरणारा क्षण बनला.