पुणे: पुणे जिल्ह्यात बारामती, भोर, दौंड, इंदापूर, जुन्नर आणि शिरूर या 6 महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील महत्त्वांच्या नगरपरिषदांचे निकाल
- माळेगाव नगरपंचायत- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा युतीला धक्का, प्रभाग क्रमांक 1, 3, 6, 7 मधील उमेदवार पिछाडीवर
- भोर- दुसऱ्या फेरीत भाजपाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप 245 ने आघाडीवर
- भोर नगपालिकेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये भाजपचे उमेदवार संजय जगताप 151 मतांनी आघाडीवर
- तळेगाव- (भाजप+ युतीचे) नगराध्यक्ष संतोष दाभाडे 3953 मतांनी आघाडीवर
- वडगाव मावळ नगरपंचायत- भाजपच्या नगराध्यक्षा मृणाल म्हाळसकर आघाडीवर
- तळेगाव नगरपरिषद - (भाजप+अजित पवार राष्ट्रवादी) युतीचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे 1989 मतांनी आघाडीवर
- जुन्नर नगरपरिषदमध्ये शिवसेना शिंदे पक्षाची आघाडी
- सुजाता काजळे (शिवसेना) - 297 आणि स्नेहल खोत (राष्ट्रवादी) - 226
- वडगाव मावळ नगरपंचायत पहिला निकाल हाती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल ढोरे एक मताने निवडून आले.
--------------
1. बारामती
बारामती नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- माळेगाव नगरपंचायत- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा युतीला धक्का, प्रभाग क्रमांक 1, 3, 6, 7 मधील उमेदवार पिछाडीवर
--------------------
बारामती नगर परिषदेसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.
----
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची युती
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ जागा बिनविरोध; नगराध्यक्ष पदासह उर्वरित 33 जागांसाठी चौरंगी लढत
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती नगरपरिषदेत मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदासह उर्वरित 33 जागांसाठी चौरंगी लढत होत आहे.
यामध्ये अनुप्रिता डांगे, अश्विनी सुरज सातव, अभिजीत जाधव, धनश्री अविनाश बांदल, किशोर मासाळ, श्वेता योगेश नाळे, आफरीन फिरोज बागवान यांचा समावेश आहे. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला.
बारामतीत राष्ट्रवादीने मिळवलेल्या या यशानंतर ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी समाधान व्यक्त केलं. अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतली आहे. ही विजयाची सुरुवात असून निवडणुकीतही राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
-----
बारामती नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- सचिन सातव - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)
- बळवंत बेलदार - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष)
- गोविंद देवकाते - भाजप पुरस्कृत पॅनल
- काळूराम चौधरी - बसपा
2. भोर
भोर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
- भोर- दुसऱ्या फेरीत भाजपाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जगताप 245 ने आघाडीवर
- भोर नगपालिकेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये भाजपचे उमेदवार संजय जगताप 151 मतांनी आघाडीवर
-----------
भोर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
भोर नगर परिषदेसाठी एकूण 77 टक्के मतदान झालं
- भोर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
3. दौंड
दौंड नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
दौंड नगर परिषदेसाठी एकूण 59 टक्के मतदान झालं
- दौंड नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
----
दौंड नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
- मोनिका प्रमोद वीर - (भाजप नेते आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांची नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी)
- कोमल रुपेश बंड - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष)
- दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)
4. इंदापूर
इंदापूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
---
इंदापूर नगर परिषदेसाठी एकूण 80 टक्के मतदान झालं
- इंदापूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
5. जुन्नर
जुन्नर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
जुन्नर नगर परिषदेसाठी एकूण 68 टक्के मतदान झालं
- जुन्नर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
---
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
जुन्नर नगर परिषद नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला राखीव
- ॲड. तृप्ती वैभव परदेशी - भाजप
- सुजाता मधुकर काजळे -शिवसेना (शिंदे गट)
- स्नेहल निलेश खोत - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- गौरी महेश शेटे - शिवसेना(ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी
- राहिन कागदी - काँग्रेस
- कांचन मेहेर - अपक्ष
- पुनम गवळी - अपक्ष
- संगीता कर्डिले - अपक्ष
- राजश्री मालेगावकर - अपक्ष
जुन्नर नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती झाली आहे. तर महायुतीतील अजित पवारांची राष्ट्रवादी ही वेगळी लढत आहे. महाविकास आघाडी मध्येही तिढा निर्माण झाला असून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढत आहे. तर काँग्रेसने आपला वेगळा उमेदवार दिला आहे. आत्ता जरी असं असलं तरी माघारीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल.
6. शिरूर
शिरूर नगर परिषदेच्या निकालाचे अपडेट:
शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होईल
----
शिरूर नगर परिषदेसाठी एकूण 71 टक्के मतदान झालं
- शिरूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
----
- विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात शाब्दीक बाचाबाची
शिरूर नगरपरिषद निवडणुकीत मतदान बंद होते वेळी विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांचा संघर्ष पाहायला मिळाला. विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्रात गेल्याने माजी आमदार अशोक पवार आक्रमक झाले. मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत जाता येत नाही असा कायदा असल्याचे सांगत आमदार अशोक पवार हे आक्रमक झाले.
विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याचंही यावेळी पाहायला मिळालं. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं माजी आमदार अशोक पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिरूर नगर परिषद निवडणुकीचा वाद सध्या तापलेला पहायला मिळतोय.
- शिरूर नगर परिषद निवडणूक: मतदानाला सुरुवात
---
शिरूर नगर परिषदेमध्ये महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला आहे. नगराध्यक्ष पद ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव आहे.
ADVERTISEMENT











