Devendra Fadnavis: 'आम्ही 115 तरी तुम्हाला मुख्यमंत्री... आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी..', कदमांना फडणवीसांचं प्रत्युत्तर!

मुंबई तक

07 Mar 2024 (अपडेटेड: 07 Mar 2024, 05:19 PM)

Devendra Fadnavis vs Ramdas Kadam: आमच्याकडे 115 आमदार असताना देखील आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री केलं. त्यामुळे आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

रामदास कदमांचा विषय फडणवीसांनी एका वाक्यात संपवला

रामदास कदमांचा विषय फडणवीसांनी एका वाक्यात संपवला

follow google news

Devendra Fadnavis vs Ramdas Kadam: मुंबई: 'भाजपने आमचा केसाने गळा कापू नये...' असं विधान करणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, मोजक्या शब्दातच त्यांनी रामदास कदमांचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून बरीच धुसफूस सुरू आहे. अशीही चर्चा आहे की, भाजप शिवसेनेला (शिंदे गट) केवळ 10 ते 12 जागाच देईल. ज्यानंतर काल (6 मार्च) शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप करत जोरदार टीका केली होती. 

रामदास कदम यांच्या टिकेनंतर महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबईत पत्रकार छेडलं असता त्यांनी रामदास कदमांच्या विधानाला फारसं महत्त्व दिलं नाही. 

'आम्ही 115  आहोत तरी शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं. पण अनेकवेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्याकरिता आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि परिपक्व लोकांनी त्या गोष्टी गंभीरतेने घेऊ नये.' अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी दिली आहे.

'आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि परिपक्व लोकांनी त्या गोष्टी गंभीरतेने घेऊ नये'

'मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो... अशा प्रकारचं वक्तव्य करणं ही त्यांची सवय आहे. टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधीकधी ते रागाने देखील बोलतात. भाजपने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही 115 आहोत. तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे.' 

'आम्ही भक्कमपणे शिंदे साहेबांच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री म्हणून आमचं पूर्ण समर्थन शिंदे साहेबांना आहे. आमच्यासोबतची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल.. यांना सोबत घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यांचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवणार आहोत. आता हे ठीक आहे की, अनेकवेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्याकरिता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरिता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात.' 

हे ही वाचा>> 'BJP ने आमचा केसाने गळा..', रामदास कदमांचा उघडउघड हल्ला

'मात्र, आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि परिपक्व लोकांनी त्या गोष्टी गंभीरतेने घेऊ नये.  कोणी काही मागायला हरकत नाही. निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल. आमच्यात कोणतेही गंभीर मतभेद नाहीच.. दोन-तीन जागांवर आपआपसात बोलत आहोत. आम्ही त्याबाबतही मार्ग काढू. सर्वांना जागा मागण्याचा अधिकार आहे.' असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना दिलं आहे. 

आता देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेनंतर रामदास कदम नेमकं काय उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

'साध्या आमदाराला धमकी दिली तर पवारांचा स्तर खाली येईल'

दरम्यान, याचवेळी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी लोणावळ्यात आमदार सुनील शेळकेंशी संबंधित जे विधान केलं त्याबाबत विचारला असता फडणवीस म्हणाले की, 'खरं म्हणजे पवार साहेब मोठेच आहेत. राजकारणात जवळपास 55 वर्ष पूर्ण झाले आहेत. या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला अशाप्रकारे धमकी दिली असेल तर ती योग्य नाही. मी काही त्यांना सल्ला देण्याएवढा मोठा नाही. पण त्यांनी याचा पुर्नविचार करावा.' 

हे ही वाचा>> 'शरद पवार म्हणतात मला.. मी तसा सोडतही नाही...'

'शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत. जर ते आमदारांना धमक्या द्यायला लागले. तर मला असं वाटतं की, त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल. मला वाटत नाही कोणी आमदार त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल.' असंही फडणवीस यावेळी म्हणाले. 

    follow whatsapp