लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर देशमुखांची सत्ता; भाजपचा दारुण पराभव.., कोणी किती जागा जिंकल्या?

अनिकेत जाधव

16 Nov 2026 (अपडेटेड: 16 Nov 2026, 01:13 PM)

latur district central cooperative bank election result : लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या सहकार पॅनलने 19 पैकी 14 जागा जिंकल्या. अरविंद पाटील निलंगेकर यांच्या परिवर्तन पॅनलला पाच जागा मिळाल्या.

latur district central cooperative bank election result

latur district central cooperative bank election result

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर देशमुखांची सत्ता;

point

भाजपचा दारुण पराभव.., कोणी किती जागा जिंकल्या?

latur district central cooperative bank election result : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने 19 पैकी 14 जागा जिंकत विजय मिळवला आहे. अरविंद पाटील निलंगेकर यांच्या परिवर्तन पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनल यांच्यात मुख्य लढत झाली. या निवडणुकीचे सर्व 19 जागांचे निकाल आज जाहीर झाले. त्यामध्ये सहकार पॅनलने 14 जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले. तर परिवर्तन पॅनलच्या पाच उमेदवारांना विजय मिळाला. त्यामुळे बँकेवरील सत्तेच्या लढाईत सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

हे वाचलं का?

सहकार पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये हेमंत जाधव (लातूर), प्रीती भोसले (उदगीर), आशिष पाटील राजूरकर (जळकोट), संतोष पाटील (चाकूर), धीरज देशमुख, जगन्नाथ पाटील, जयेश माने, सर्जेराव मोरे, विवेक सिरसाठ, अविनाश जाधव, शेषेराव हाके, चंद्रशेखर दंडीमे, शितल पाटील आणि गीतांजली लांडगे यांचा समावेश आहे. दुसरीकडे, परिवर्तन पॅनलचे अरविंद पाटील निलंगेकर, अतुल गंभीरे, भगवानराव पाटील तळेगावकर, ऋषिकेश कराड आणि शोभा पवार यांनी विजय मिळवला. अशा प्रकारे निवडणुकीतील सर्व 19 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून सहकार पॅनलचे 14, तर परिवर्तन पॅनलचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत.

विजयानंतर धीरज देशमुखांची पहिली प्रतिक्रिया 

निकाल जाहीर झाल्यानंतर धीरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केला. या विजयानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी लातूरच्या जनतेचे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व मतदारांचे आभार मानले. सहकार पॅनलने यापूर्वी केलेल्या कामाचा विचार करून मतदारांनी पुन्हा काम करण्याची संधी दिली असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी केलेल्या प्रत्येक टीकेला आम्ही कामाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे आणि मतदारांनीही आमचे काम समोर ठेवून मतदान केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सहकार क्षेत्रामध्ये आजपासून एक नवीन पर्व सुरू झाले असून यापुढेही सकारात्मक पद्धतीने नवीन चेहरे घेऊन जनतेची सेवा करू, असेही धीरज देशमुख यांनी सांगितले.