‘तुमची किंमत जर ठेवायची असेल तर…’, पाहा नितेश राणे जरांगे-पाटलांना असं का म्हणाले

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापलेले असताना त्यामध्ये आता भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी राजकीय मुद्यावर बोलू नये असा सल्ला दिला आहे.

If you want to keep your worth stop talking politics bjp mla nitesh rane advises manoj jarange patil

If you want to keep your worth stop talking politics bjp mla nitesh rane advises manoj jarange patil

मुंबई तक

01 Nov 2023 (अपडेटेड: 01 Nov 2023, 09:21 AM)

follow google news

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आज सर्वपक्षीय बैठक असतानाच भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leader) मराठा आरक्षणाबाबत वेगवेगळी अश्वासनं दिली जात आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर टीका करत त्यांना मैत्रीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मत व्यक्त करत त्यांनी कोणत्याही राजकीय मुद्यावर चर्चा करु नये असा सल्ला दिला आहे. त्यामुळे राणे-जरांगे असा वादही रंगण्याची चर्चा सुरु आहे.(If you want to keep your worth stop talking politics bjp mla nitesh rane advises manoj jarange patil)

हे वाचलं का?

राणे-जरांगे वाद

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर राजकीय नेते आणि त्यांच्यामध्ये काही वेळा तू तू मैं मैं झाले होते. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्यामध्येही वाद रंगला होता. त्यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी एकमेकांवर टीका केली होती. तर आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना सल्ला देत त्यांनी आता राजकीय चर्चा करु नये असा सल्ला दिला आहे.

राणेंनी दिला मैत्रीचा सल्ला

नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना सांगितले की, माझी किंमत भाजपला माहिती आहे. तुमची किंमत जर ठेवायची असेल तर राजकीय बोलायचं बंद करा. हा माझा मैत्रीचा सल्ला असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले आहे. यावेळी नितेश राणे यांनी सांगितले की, उद्या बनसोडे-साळुंखे हे कोण हे समजणारच आहे.

हे ही वाचा >> Maratha Reservation : “मी त्याला फाडून खाईन”, आमदार गायकवाडांचं धक्कादायक विधान

गाड्या फोडणारे नेमके कोण?

मराठा आरक्षणासाठी ज्या-ज्या आमदारांची घरं, गाड्या फोडल्या गेल्या आहेत. ते फोडणारे कोणीही मराठा समाजाचे नसल्याचेही त्यांनी सांगितले. ही माणसं ठाकरे-पवारांचे असल्याचे म्हणत त्यांनी गंभीर आरोप केला आहे. प्रदीप साळुंखे व बनसोडे हे कोणाचे पिल्लू आहेत याचं उत्तर विनायक राऊत यांनी द्यावं असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

सरकार वडापावची गाडी नाही

यावेळी उद्धव ठाकरे सरकारवर टीका करताना त्यांनी हे सरकार वडापावची गाडी नाही म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर खोचक टीका केली आहे. त्यांनी विश्वासानं सांगिते आहे की, आमचं सरकार कायम टीकणारं आहे. त्यामुळे दोन्ही राऊतांना डबलबारीसाठी बोलवा येवढेच काम त्यांना राहिले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

    follow whatsapp