नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावर विशेष चर्चा सुरू आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जोरदार भाषण केलं. याच भाषणादरम्यान, अमित थेट म्हणाले की, 'हमारी सेना ने तो ठोक दिया...'
ADVERTISEMENT
पाहा अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'या लोकांचं (विरोधकांचं) असं होतं की, बैसरनचे जे गुन्हेगार होते ते पाकिस्तानात पळून गेले. तेव्हा मोठ्या आवाजात विचारत होते की, पळून गेले, पळून गेले.. गृहमंत्री काय करतायेत.. त्यांनी जबाबदारी घ्यावी. आमच्या सैन्याने तर दहशतवाद्यांना ठोकलं. सीआरपीएफने ठोकलं.. आता अशावेळी मी उत्तर देणं काही गरजेचं नाही.'
'हे विचारत होते की, दहशतवादी कसे काय पळून गेले? मी यांना काही गोष्टी संक्षिप्तपणे सांगू इच्छितो. दाऊद इब्राहिम कासकर 1986 मध्ये पळून गेला तेव्हा राजीव गांधींचं सरकार होतं.'
हे ही वाचा>> पुण्यात खळबळ! पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह 6 जणांना अटक!
'सय्यद सलाउद्दीन 1993 मध्ये पळून गेला तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. टायगर मेमन 1993 मध्ये पळून गेला काँग्रेसचं सरकार होतं, अनिस इब्राहिम 1993 मध्ये पळून गेला यांचं सरकार होतं.'
'रियाज भटकळ 2007 मध्ये पळून गेला तेव्हाही यांचं सरकार होतं. इक्बाल भटकळ 2010 मध्ये पळून गेला.. यांचं सरकार होतं. मिर्झा सादाब बेग 2009 मध्ये पळून गेला तेव्हाही यांचंच सरकार होतं.'
'आता यांनी माझं तर उत्तर मागितलं.. आमच्या सुरक्षा दलांनी उत्तरही दिलं. आता राहुल गांधींनी याचं उत्तर द्यावं.'
हे ही वाचा>> पुणे: ऑफिसच्या 7 व्या मजल्यावरुन उडी अन् सुसाइड नोटसुद्धा... पुण्यातील IT इंजिनीयरचं टोकाचं पाऊल
'मी आज 2004 ते 2014 आणि 2015 ते 2025 या 10-10 वर्षांचा लेखाजोखा ठेवू इच्छितो. 20024 ते 2014 या वर्षात सोनिया-मनमोहन यांची अखंड सत्ता होती. आणि 2015 ते 2025 या 10 वर्षात अखंडपणे नरेंद्र मोदीजी यांची सत्ता होती. या काळात दहशतवादी हल्ले किती झाले ते.'
'एक जमाना होता की, 10-10 हजार लोकं दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला जमा व्हायचे. संपूर्ण देशाने घटना पाहिल्या असतील.. बुरहान वाणी अमूक-तमूक मेला.. आता जो मारला जातो त्याला तिथेच मारलं जातं. कोणत्याही दहशतवाद्याचं उदात्तीकरण करण्यासाठी अंत्ययात्रेची परवानगी नरेंद्र मोदींच्या शासनात नाही.'
'दहशतवाद्यांचे नातेवाईक आणि त्यांचे समर्थक यांना निवडून, निवडून आम्ही नोकऱ्यांमधून काढून टाकले आहेत. पासपोर्ट रद्द केले आहेत.' असं अमित शाह यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
