नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मागील 2 दिवसांपासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. याच चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत आले. जिथे आपल्या भाषणादरम्यान, काँग्रेस आणि विरोधकांवर संतापलेले दिसून आले.
ADVERTISEMENT
'पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येत देखील ते आपलं राजकारण शोधत होते. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर निशाणा साधत होते. पण त्यांची ही टीकाटिप्पणी, यांचं छिछोरपणा.. देशाच्या सुरक्षा दलाचं मनोबल कमी करत होतं.' असं म्हणत PM मोदींनी यावेळी बराच संताप व्यक्त केला.
पाहा लोकसभेत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले
'ऑपरेशन सिंदूर जगाचं समर्थन मिळालं, अनेक देशांनी समर्थन केलं. पण हे दुर्भाग्य आहे की, माझ्या देशातील वीरांच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन नाही. 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याच्या 3-4 दिवसानंतरच हे उड्या मारत होते. असं म्हणायला लागले की, कुठे गेली 56 इंचांची छाती? कुठे गेला मोदी? मोदी तर फेल झाला.. काय मजा घेत होते.'
हे ही वाचा>> 'दम असेल तर PM मोदींनी म्हणावं ट्रम्प खोटारडे आहेत..', राहुल गांधींचं थेट आव्हान
'त्यांना वाटत होतं की, बाजी मारली.. त्यांना पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येत देखील ते आपलं राजकारण शोधत होते. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर निशाणा साधत होते. पण त्यांची ही टीकाटिप्पणी, यांचं छिछोरपणा.. देशाच्या सुरक्षा दलाचं मनोबल कमी करत होतं.'
'यांना ना भारताच्या सामर्थ्यावर भरोसा आहे, ना यांना भारताच्या सैन्यावर भरोसा आहे. म्हणून ते सततत ऑपरेशन सिंदूरवर सवाल उपस्थित करत आहेत. असं करून तुम्ही मीडियामध्ये हेडलाइन्स तर घेऊ शकतात. पण, देशावासियांच्या मनात स्थान मिळवू शकत नाहीत.'
'जेव्हा सर्जिकल स्ट्राइक केला होता तेव्हा आम्ही ठरवलेलं की, आपले जवान त्यांच्या देशात जाऊन दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड नष्ट करतील. सर्जिकल स्ट्राइकमध्ये आपले जवान सूर्योदयाआधी परत आले.'
हे ही वाचा>> 'हमारी सेना ने तो ठोक दिया...', पहलगाम हल्ल्यावर बोलताना अमित शाह नेमकं काय म्हणाले?
'बालाकोट एअर स्ट्राइक केला तेव्हा आमचं लक्ष्य निश्चित होतं की, दहशतवाद्यांचे ट्रेनिंग सेंटर नष्ट करायचे. आम्ही ते देखील करून दाखवलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आमचं लक्ष्य निश्चित होतं. आमचं लक्ष्य होतं की, दहशतवाद्यांचे जे एपी सेंटर आहेत, जिथे ट्रेनिंग मिळाली ते सेंटर नष्ट करायचे. आम्ही तिथेच हल्ला केला. 100 टक्के अचूक हल्ला करत आम्ही देशाच्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली.'
'काही जण जाणूनबुजून गोष्टी विसरण्यात माहीर असतात. पण देश विसरत नाही. 6 ते 7 मे रोजी ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर पत्रकार परिषद झाली होती. त्याचवेळी स्पष्ट केलं होतं की, आमचं लक्ष्य हे आहेत दहशतवादी, त्यांचे आका.. त्यांचे अड्डे. हे सगळं आम्हाला उद्ध्वस्त करायचं होतं. आम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, आम्ही आमचं काम केलेलं आहे.'असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
