Pranjal Khewalkar Arrest : पुण्यातील एका धक्कादायक घटनेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येथील खराडी परिसरात पुणे पोलिसांनी काल शनिवारी रात्री एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. एका लॉजच्या रुममध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. पोलिसांनी घटनास्थळी ड्रग्ज, दारू आणि गुटखा जप्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचाही या पार्टीत समावेश असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी प्रांजल यांना अटक केली असून गुंड बॉबी यादवचा भाऊ श्रीपाद यादवच्याही मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी 2 महिलांसह 5 पुरुषांना बेड्या ठोकल्या आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही रेव्ह पार्टी खराडी परिसरात असलेल्या एका स्टुडिओत सुरु होती. या रेव्ह पार्टीवर छापा टाकून दोन महिलांसह पाच पुरुषांना पुणे पोलिसांनी अटक केली. तसच पुणे पोलिसांनी या छाप्यात वीड आणि कोकेन जप्त केलं. एनडीपीएस कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय.
हे ही वाचा >> मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरेंची मातोश्रीकडे पावलं, बाळासाहेबांचं स्वप्न साकार... नेमकं काय घडलं?
खराडी परिसरातील स्टे बर्ड नावाच्या लक्झरी गेस्ट हाऊसमध्ये पुणे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केले. पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. या रेव्ह पार्टीत सामील असलेले लोक अंमली पदार्थांचं सेवन करत होते. यामध्ये कोकेन, एमडी ड्रग्ज आणि महागडे मद्याचा समावेश असल्याचं समोर आलंय. दरम्यान, या रेव्ह पार्टीत आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, याचा तपास पुणे पोलिसांकडून सुरु आहे.
या प्रकरणावर सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
स्वायत्त यंत्रणेचा किती आणि कसा गैरवापर करावा, हे भाजपकडून शिकलं पाहिजे. मागच्या काही वर्षात हे महाराष्ट्र आणि भारताला सर्वश्रूत आहे. खडसेंनी महाजनांवर काही आरोप केलेले आहेत, चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे. त्याचदरम्यान प्रांजल खेवलकर यांच्यावर कारवाई होते. रेव्ह पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जातंय. पण या हाऊस पार्टीत खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते, हा संशोधनाचा मुद्दा आहे. सर्व गृहखात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारित आहे. महाजन फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना UBT च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलीय.
ADVERTISEMENT
