'अंबरनाथमध्ये आम्ही शिंदेंसोबतच जायला हवं होतं, पण...', काँग्रेससोबतच्या युतीवर CM फडणवीसांचं मोठं विधान

CM Devendra Fadnavis: अंबरनाथमध्ये भाजपने बहुमतासाठी सुरुवातीला काँग्रेसशी युती केली होती. ज्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली. याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

in ambernath we should have gone with eknath shinde but due to disagreements an alliance was formed with congress cm devendra fadnavis big statement

ाँग्रेससोबतच्या युतीवर CM फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई तक

08 Jan 2026 (अपडेटेड: 08 Jan 2026, 10:08 PM)

follow google news

मुंबई: अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीनंतर भाजपने अत्यंत चक्रावून टाकणारा असा निर्णय भाजपने घेतला. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला होता. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. कारण अटीतटीच्या लढाईत भाजपने आपला नगराध्यक्ष निवडून आणला होता. पण असं असलं तरी अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले होते. मात्र सभागृहातील बहुमताच्या आकड्यापासून (30 नगरसेवक) ते दूर राहिले. अशावेळी बहुमतासाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण सर्वांचा अंदाज चुकवत अंबरनाथमध्ये भाजपने जी खेळी केली त्याची चर्चा केवळ राज्यातच नाही तर देशभरात सुरू झाली. ती खेळी म्हणजे भाजपची चक्क काँग्रेससोबतची युती. 

हे वाचलं का?

जेव्हा याबाबतची माहिती समोर आली तेव्हा भाजपवर प्रचंड टीका सुरू झाली. दुसरीकडे काँग्रेसने अंबरनाथमधील 12 नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर आज (8 जानेवारी) तात्काळ काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. पण याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'आज तक'च्या मंथनमध्ये थेट सवाल विचारण्यात आला.

हे ही वाचा>> अकोल्यात AIMIM सोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपची युती, आता देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आम्ही त्यांना सोबत घेऊन तिथे बहुमत तयार करायला हवं होतं. पण स्थानिक नेत्यांचे असणारे मतभेद त्या मतभेदांचा हा परिणाम होता की, त्यांनी त्यांच्यासोबत युती केली नाही.'

पाहा देवेंद्र फडणवीस म्हणाले नेमकं काय म्हणाले भाजप-काँग्रेस युतीबाबत.

'ही बिल्कुल चुकीची गोष्ट आहे. काँग्रेससोबत कोणतीही हात-मिळवणी केलेली नाही. काँग्रेसचे 12 नगरसेवक हे भाजपमध्ये आले आहेत. आम्ही त्यांना भाजपमध्ये घेतलं आहे. त्यांनी काँग्रेस सोडली. जर कोणाला काँग्रेसमधून भाजपमध्ये यायचं असेल तर आम्ही त्यांना का रोखू? तसाही हा स्थानिक पातळीवरचा निर्णय होता. जिथवर माझं मत म्हणाल तर आम्ही शिंदेंसोबतच जायला हवं होतं तिथे. पण अनेकदा जी छोटी शहरं असतात.. इथे भलेही वर आमची युती असेल. पण तिथे छोट्या शहरांमध्ये दोन नेत्यांमध्ये मतभेद असतात. त्याच मतभेदांचा हा परिणाम होता.' 

'आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की, आम्ही काँग्रेससोबत नाही जाणार.. एक तर आमच्याकडे अकोट.. छोटं शहर आहे. तिथे MIM सोबत काही लोकांनी.. पण तिथेही युती अशी झाली की, आमची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती होती. तिथे अजितदादांच्या NCP ने MIM ला सोबत घेतलं. त्यामुळे एक प्रकारे आमच्यासोबत.. पण आम्ही तात्काळ तिथे हे म्हटलं की, आम्हाला हे चालणार नाही. आम्ही युती तोडली. त्यांना बाहेर काढलं. आणि आमचा जो आमदार आहे त्या आमदाराला निलंबनाची नोटीस पाठवली.'

हे ही वाचा>> अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती, शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं, नेमकं कारण काय?

'बघा खालच्या स्तरावरील नेते हे चुका करतात कधी-कधी. त्यांना हे लक्षात येत नाही. पण पक्षात हे अजिबात सहन केलं जाणार नाही. आम्ही आमच्या आमदाराला निलंबनाची नोटीस पाठवली आहे.'

'अंबरनाथमध्ये आम्ही आणि शिंदेजी समोरासमोर लढलो. आमचा नगरध्यक्ष निवडून आला. तर नगरसेवक त्यांचे आणि आमचेही निवडून आले. बहुमत दोघांकडे नव्हते. आता व्हायला हे हवं होतं की, आम्ही त्यांना सोबत घेऊन तिथे बहुमत तयार करायला हवं होतं. पण स्थानिक नेत्यांचे असणारे मतभेद त्या मतभेदांचा हा परिणाम होता की, त्यांनी त्यांच्यासोबत युती केली नाही. मी कालही अधोरेखित केलंय की, भलेही काँग्रेसचे 12 लोकं आमच्यासोबत आले असतील. पण तरीही आपल्याला अंबरनाथमध्ये युती ही शिंदेंसोबतच करायची आहे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
 

    follow whatsapp