Ind Vs Pakistan War: श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्लानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणावजन्य परिस्थिती निर्माण झालीय. दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार असल्याचं बोललं जात आहे. भारत लवकरच दहशतवाद्यांविरोधात दोन हात करत मोठी कारवाई करणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्ताननेही हालचालीस सुरूवात केली आहे. पाकिस्तानी लष्करांचा मोठा ताफा सीमेकडे तैनात करण्यात आल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.
ADVERTISEMENT
पाकिस्तानी लष्करांच्या सैन्यांचा मोठा ताफा भारताच्या सीमेकडे रवाना झाल्याचं बोललं जात आहे. पाकिस्तानी पंजाबमधील चिचवटनी, साहिवाल, पट्टोकी भागात हा ताफा तैनात करण्यात आला. पाकिस्तानी लष्करांकडे काही प्रमाणात हलक्या तोफांचाही समावेश करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी होणार मॉक ड्रिल, सुरक्षेच्या दृष्टीनं तीन स्तरांमध्ये विभागणी, कशी असेल प्रक्रिया?
तर ही युद्धजन्य परिस्थिती घडवून आणण्यासाठी पाकिस्तानात काहीना काही कुरापती सुरू आहेत. अशातच आता भारतही चोख प्रत्यत्तर देतंय. दरम्यान, आता पाकिस्तानी लष्करांच्या कुरापतींचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात पाकिस्तानी लष्कर युद्धाच्या पार्श्वभूमीवर सज्ज होण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे.
भारत पाकिस्तान लष्करांची तुलना :
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार, भारताचे लष्कर हे जगातील एकूण लक्षरांच्या तुलनेत चौथ्या क्रमांकावर आहेत. भारताकडे सैन्याचा विचार केल्यास 14.55 लाख सैन्य सक्रिय आहेत. तर 11.55 लाख राखीस सैन्य आहेत. तर भारतीय लष्करांच्या ताफ्यात 4 हजार 614 रणगाडे, 2 हजार 229 हवाई वाहनांचा समावेश आहे. ज्यात 600 लढाऊ विमानं असून 150 युद्धनौकांचा समावेश आहे. 2 विमानवाहू युद्धनौकांचाही समावेश असल्याचं संबंधित अहवालात सांगण्यात आलं आहे. भारताकडे अग्नी 5, ब्रह्माससारखी क्षपणास्त्रे आहेत. त्याचप्रमाणे उंचीवरील युद्धाचा व्यापक अनुभव आहे, ज्यामुळे लष्करी ताकद बळकट होते.
हे ही वाचा>> Pahalgam Attack: नक्कीच काही तरी मोठं घडणार, जोरदार तयारी सुरू; मोदी-शाहांच्या मनात नेमकं काय?
अशातच पाकिस्ताकडे सुमारे 5.6 लाख सैनिक आहेत. तर लष्करी ताफ्यात 2 हजार 496 रणगाड्यांचा समावेश आहे. तसेच 425 विमाने आणि छोट्या नौदल तोफांचाही यात समावेश आहे. पाकिस्तानकडे शाहीन-3 सारखी क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. तर लष्करी तंत्रज्ञान, साधनसामग्री आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत तो भारताच्या तुलनेत पाकिस्तान बराच मागे आहे.
ADVERTISEMENT
