Pahalgam Attack: नक्कीच काही तरी मोठं घडणार, जोरदार तयारी सुरू; मोदी-शाहांच्या मनात नेमकं काय?

मुंबई तक

pahalgam Attack : काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्लानंतर केंद्र सरकार प्रत्युत्तर देणार आहे. याचपार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैनिकांचा आढावा घेतला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काश्मीरातील पहलगाम हल्लाबाबत केंद्र सरकार प्रत्युत्तर देणार आहे.

point

राजनाथ सिंह यांनीही यावर मोठं भाष्य केलं आहे.

Pahalgam Attack: नवी दिल्ली: काश्मीरातील पहलमगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार प्रत्युत्तर देणार असल्याचं बोललं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्यांच्या एकूण तयारीबाबत आढावा घेतला. वृत्त माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, झालेल्या बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयावर चर्चा केली आहे. यानंतर आता काश्मीरमध्ये झालेल्या पहलमगाम हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली आहे. 

नुकत्याच  झालेल्या बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयावर चर्चा केली आहे. नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी पंतप्रधान यांची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या दृष्टीकोनातून अरबी समुद्रावर भाष्य केलं. समुद्रात सुरू असलेल्या नौदल सरावाच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम नौदलाच्या सर्व आघाडीवर युद्धनौका, विमाने आणि ताफ्यातील नौका समुद्रामार्गे तैनात करण्यात येणार आहेत. संरक्षण सूत्रांच्या मते, सरकारकडून आदेश मिळताच नौदल कोणत्याही कारवाईसाठी सज्ज आहे. दिल्लीतील सनातन संस्कृती जागरण महोत्सवात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केलं.

हे ही वाचा>> पुणे हादरलं! कोंढव्यामध्ये चीड आणणारा प्रकार, 9 वर्षाच्या मुलीवर स्वच्छतागृहात अत्याचार, आरोपी...

भारतावर वाईट नजर टाकतील त्यांना चांगलं उत्तर देऊ!

ते म्हणाले की, 'संरक्षण मंत्री म्हणून मी देशाच्या संरक्षणासाठी असणाऱ्या सैनिकांचं संरक्षण करेल. जे आपल्या भारतावर वाईट नजर टाकतील त्यांना चांगलंच उत्तर देऊयात. हेच जर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाल्यास भारताची इच्छापूर्ती होईल.' तसेच 29 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. तेव्हा मोदी म्हणाले की, 'पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाईची पद्धत, लक्ष्य आणि वेळ याचं लष्करांना स्वतंत्र देण्यात आलं आहे.'

हे ही वाचा>> HSC Result 2025 : संपूर्ण महाराष्ट्रात मिताली काबराचीच चर्चा! बारावीच्या परीक्षेत किती टक्के गुण मिळाले?

या बैठकीत राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल सिंह आणि नौदल प्रमुख एडमिरल त्रिपाठी यांचा यामध्ये समावेश होता. या घटनाक्रमानंतर पाकिस्तानने आपल्या सैन्याला हाय अलर्ट जारी केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने आपल्या आघाडीच्या तुकड्यांमध्ये सुमारे 30 टक्के सैनिक तैनात केले आहेत. पाकिस्तानी सैन्याने आता काही शस्त्तास्त्रांचा साठा करून ठेवला आहे. वेळ पडल्यास ते याचा वापर करतील असं सांगण्यात येत आहे.

पहलगाम आतंकी हल्ल्यात 28 निष्पाप व्यक्तींची हत्या

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात 28 निष्पाप व्यक्तींची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर देशभरात चिंतेची बाब निर्माण झाली आहे. त्याच प्रमाणे हळहळही व्यक्त केली जात आहे. मोदींनी सैनिकांनी स्वतंत्र देऊन स्पष्ट केलं की, ते या हल्ल्याचं योग्य ते उत्तर देणार आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp