India Alliance Logo : तिरंग्यातील रंग, इंटेलिक फॉन्ट…,कसा असणार आहे I.N.D.I.A आघाडीचा लोगो?

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशातील विरोधी पक्षानी मिळून एक आघाडी तयार केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीए विरूद्ध इंडिया अशी लढत पाहायला मिळणार आहे.

india allance logo it will reveal in opposition meeting india vs nda

india allance logo it will reveal in opposition meeting india vs nda

ऋत्विक भालेकर

• 03:03 PM • 24 Aug 2023

follow google news

India Alliance Logo : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात देशातील विरोधी पक्षानी मिळून आघाडी तयार केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत एनडीए (NDA) विरूद्ध इंडिया (I.N.D.I.A )अशी लढत पाहायला मिळणार आहे. या लढतीत एनडीएला तगडं आव्हान देण्यासाठी इंडिया पक्षाची म्हणजेच विरोधकांचे देशभरात बैठकांच सत्र सुरू आहे. त्यानुसार आता इंडिया पक्षाची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधकांच्या आघाडी पक्षाच्या चिन्हाची घोषणा होणार आहे. त्यामुळे इंडिया पक्षाचे चिन्ह कसे असणार आहे? या चिन्हाची खासियत काय आहे असणार आहे, हे जाणून घेऊयात. (india allance logo it will reveal in opposition meeting india vs nda)

हे वाचलं का?

इंडिया पक्षाचे चिन्ह कसे असणार?

विरोधकांच्या आघाडीला इंडिया पक्षाचे नाव देण्यात आले होते. या नामांतरानंतर आता पक्षाचे चिन्ह ठरवण्यात आले आहे. साधारण इंडिया पक्षासाठी 9 चिन्ह बनवण्यात आली होती. यामधील एकच चिन्ह सर्वाधिक विरोधी पक्षांना आवडले आहे. हे चिन्ह कसे असणार आहे, हे जाणून घेऊय़ात.

विरोधकांच्या इंडिया पक्षाच्या चिन्हात देशाच्या तिरंग्यातील चारही रंगाचा वापर करण्यात आला आहे.ज्यामध्ये भगवा, सफेद,निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे. हा लोगो इंटेलिक फॉन्टमध्ये असणार आहे. या चिन्हाला विरोधी दलाची सर्वाधिक पसंती आहे. दरम्यान अद्याप तरी हे चिन्ह अधिकृतरीत्या ठरवण्यात आले नाही आहे. मात्र येत्या बैठकीत या लोगोची घोषणा होण्याची शक्यता आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

इंडिया पक्षाच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, इंडिया पक्षाच्या मुंबईतील बैठकीत पक्षाच्या नवीन चिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे. या चिन्हात भारताची झलक दिसणार आहे. या चिन्हात असे सर्व काही जे देशाला एकसंध ठेवण्यासाठी आवश्यक आहे,असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच या बैठकीवरून विरोधी पक्षांमध्ये उत्सुकता आहे. ईशान्येकडील काही नवीन पक्षही आमच्या आघाडीत सामील होऊ शकतात, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

11 सदस्यांची कमिटी बनवणार

दरम्यान येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला विरोधकांची मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत विरोधी दलाचे 5 मुख्यमंत्री, 26 राजकीय पक्ष आणि 80 नेते सहभागी होणार आहे. या बैठकीत 11 सदस्यांची कमिटी बनवण्यात येणार आहे. या कमिटीत शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी (शरद पवार गट), तृणमुल काँग्रेस, डावे आण डिएमकेसहित प्रमुख दलातील एका-एका सदस्याची निवड करण्यात येणार आहे.

आता इंडिया पक्षाचे चिन्ह कसे असणार आहे व इंडिया आघाडीच्या 11 सदस्यांच्या कमिटी कोणकोणते नेते असणार आहेत,याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

    follow whatsapp