Maharashtra SSC Result 2025 Latur : राज्यातील लाखो 10 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची लक्ष दहावीच्या निकालावर लागून होतं. आज अखेर ते निकाल लागले आणि पास विद्यार्थ्यांमध्ये आनंद पाहायला मिळतोय. यावर्षी राज्याचा निकाल 93.66 एवढा लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा निकाल 0.66 जास्त आहे. तर दुसरीकडे यंदाही या निकालात लातूर पॅटर्न पाहायला मिळाला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Maharashtra SSC Result 2025: 10 वीचा ऑनलाइन निकाल जाहीर, mahresult.nic.in वर पाहा तुमची मार्कशीट
पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर,मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून 15 लाख 58 हजार 20 नोंदी झा्ल्या होत्या. तर या परीक्षेत 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी तब्बल 14,55433 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत.विशेष म्हणजे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. तर दुसरीकडे लातूरच्या विद्यार्थ्यांनी या निकालातही डंका वाजवलाय.
लातूर विभागातील तब्बल 113 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवून राज्याच्या निकालात लातूर पॅटर्नचा ठसा पुन्हा उमटवला आहे. राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात लातूर विभाग राज्यात सर्वांत मागे राहिला होता. मात्र दहावीच्या निकालात शंभर पैकी शंभर टक्के गुण घेणारे राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. त्यामुळे या निकालातून लातूर पॅटर्नचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
हे ही वाचा >> CBSE Board 10th Result: CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, पाहा महाराष्ट्रात किती विद्यार्थी झाले पास?
राज्यातील 211 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजेच शंभर टक्के गुण मिळवले आहेत. यात एकट्या लातूर विभागातील 113 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्य मंडळाने दिलीय. 2024 मध्ये राज्यातील 187 विद्यार्थ्यांपैकी लातूर विभागातील तब्बल 123 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले होते.
ADVERTISEMENT
