Karegaon Sarpanch Nirmala Shubham Nawale contest the election : कारेगावच्या माजी सरपंच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. निर्मला नवले यांनी कारेगाव कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास तयारी सुरु केली आहे. शिवाय माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून नवले यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा इरादा बोलून दाखवलाय.
ADVERTISEMENT
पंचायत समितीच्या निवडणूक लढवण्यासाठी निर्मला नवले इच्छुक
निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, राजकारण आणि समाजकारणाचा नवा अध्याय! आपल्या कारेगाव कान्हूरमेसाई गटाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मा. गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपला विश्वास, माझा निर्धार! आता फक्त विकास!
सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग
निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. कारेगावच्या सरपंचपद सांभाळण्याचा त्यांना अनुभव असून त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रियपणे काम करताना पाहायला मिळतात. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आणि निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाचा प्रचार करण्यावर भर दिला होता. हे पाहून अजित पवारांनी त्यांच्यावर Working President NCP Yuvati Maharashtra या पदाची जबाबदारी देखील सोपवली होती.
इन्स्टाग्रावर त्यांचे 538K फॉलोवर्स आहेत. त्यामुळे नवले मॅडम यांनी शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यामुळे सुशिक्षित आणि प्रभावी नेत्या म्हणून दिलीप वळसे पाटील त्यांना उमेदवारी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वादावर अजित पवारांचं सविस्तर भाष्य, म्हणाले...
ADVERTISEMENT











