Tejasvee Ghosalkar : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच सोडत जाहीर झाली. या सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांना जोराचा धक्का बसला आहे. ओबीसी आरक्षणामुळे काही दिग्गजांना आपल्या वॉर्डमधून निवडणूक लढता येणार नसल्याचं चित्र आहे. यामुळे महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे काही नगरसेवकांना दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या वॉर्डमध्ये ओबीसी आरक्षणाच्या उमेदरावाला संधी मिळाल्याने तेजस्वी घोसाळकर यांना त्यांच्याच प्रबागात निवडणूक लढता येणार नाही. हे बघून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाराजीचा सूर धरल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, राणा जगजितसिंह पाटलांचं निवडणुकीआधी तगडं प्लानिंग
अशातच आता महापालिकेच्या निवडणुकीत सोडतीत जवळपास तब्बल 59 माजी नगरसेवकांच्या प्रभागाचे आरक्षण यंदाही कायम राहिल्याचं बोललं जात आहे. यामुले निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा आहे. तर काही वॉर्डात अनेक टर्म निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना आपल्या वॉर्डातून निवडणुकीला उभं राहता येणार नाही. यापैकी सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे तेजस्वी घोसाळकर असे आहे. त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे.
तेजस्वी घोसाळकर यांची पोस्ट चर्चेत
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली. माझ्या वार्ड क्रमांक 1 मध्ये नागरिक प्रवर्ग म्हणजेच ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे. मी ओबीसी प्रवर्गातील नसल्यामुळे ही निवडणूक लढवू शकत नाही, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत दुःखद आहे. परंतु दुःख ह्याचे नाही की, मी निवडणूक लढवू शकत नाही, दुःख हे आहे की, मी आता माझ्या प्रभागातील तसेच दहिसर विधानसभा मतदारसंघातील सामान्य माणसाची सेवा प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी म्हणून करू शकणार नाही.
परंतु, या निर्णयामुळे माझ्या जनसेवेचा मार्ग थांबणार नाही. कारण अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या घोसाळकर कुटुंबीयांइतकीच साथ मला ह्या प्रभागातील तसेच दहिसर-बोरिवलीतील सर्वच लोकांनी दिलेली आहे.
हे ही वाचा : Delhi Blast नंतर ऑपरेशन सिंदूर-2?, PM मोदींच्या मनात नेमकं काय.. 'या' बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष
म्हणूनच आज, उद्या आणि येणाऱ्या प्रत्येक काळात, माझ्या प्रभागातील, तसेच संपूर्ण दहिसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी, त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक किंवा सार्वजनिक अडचणींसाठी, मी नेहमीप्रमाणेच, अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहीन, ही माझी मनापासूनची खात्री आणि वचन आहे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT











