Delhi Blast नंतर ऑपरेशन सिंदूर-2?, PM मोदींच्या मनात नेमकं काय.. 'या' बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष

मुंबई तक

Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर बुधवारी सुरक्षामंत्रिमंडळ समितीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर CCS ची बैठक बोलावण्यात आली होती, त्यात नेमकी काय चर्चा झाली. ऑपरेशन सिंदूर 2 पुन्हा होणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

Delhi Blast
Delhi Blast
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दिल्ली स्फोटानंतर सुरक्षामंत्रिमंडळ समितीची बैठक

point

पंतप्रधान कारवाई करणार?

Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटानंतर बुधवारी सुरक्षामंत्रिमंडळ समितीची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर CCS ची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यात पाकिस्तानी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे सांगण्यात येत आहे. अशातच आता याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीतून नेमकं कोणतं ठोस पाऊल उचणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा : Weather update : राज्यात 'या' भागात वाहणार थंड वारे, तापमानाचा पारा झटकन घसणार!

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अशातच आता, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, दिल्लीत एक मोठा कार स्फोट झाला. या हल्ल्याचे जैश-ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे संबंध हे थेट पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी जोडले जात आहेत. अशातच देशाच्या पंतप्रधानांनी  कारवाई करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे अशी की, दिल्लीतील स्फोट हा आत्मघातकी होता, ज्यात कारचा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय लष्करांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. 

हे ही वाचा : Delhi Blast: तपासात उघड झाली अत्यंत मोठी माहिती, ‘ती’ गोष्ट झाली नसती तर अत्यंत भयंकर…

तसेच दिल्लीत दहशत निर्माण करणाऱ्यांचे थेट संबंध हे पाकिस्तानातील दहशतवाद्यांशी कुठेतरी जोडले जात आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानमधून दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करणार आहेत, अशी घोोषणा केली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp