Weather update : राज्यात 'या' भागात वाहणार थंड वारे, तापमानाचा पारा झटकन घसणार!
Maharashtra Weather : राज्यात ठिकठिकाणी तापमान वेगळं राहण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे थंड हवामान राहण्याची शक्यता आहे, जाणून घेऊया राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात ठिकठिकाणी तापमान वेगळं राहण्याची शक्यता
'या' भागांत थंड वारे वाहण्याची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात ठिकठिकाणी तापमान वेगळं राहण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये रात्री आणि पहाटे थंड हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाड्यात रात्रीपासून पहाटेपर्यंत तापमान घसरताना दिसत आहे. येत्या 7 दिवसांमध्ये तापमानाचा पारा 5 अंश सेल्सिअसने आणखी खाली येण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊयात एकूण राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पांडुरंगा... वारकऱ्यांच्या दिंडीत थेट कंटेनर शिरला, मुंबई-पुणे महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू
कोकण विभाग :
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबईत हवामान विभागाने तापमान एकसारखे राहणार नसल्याचं सांगितलं आहे. या विभागातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे मुंबईत सकाळच्या सुमारास थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्रातील विभागात पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यात तापमान 10 डिग्रीपर्यंत खाली आल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे हवामानात बदल निर्माण झाला आहे.
हे ही वाचा : बोरिवलीतील सुधीर फडके पुलाखाली नराधमानं महिलेला ओढून नेलं, नंतर तिचं लैंगिक शोषण करत... चीड आणणारा प्रकार
मराठवाडा विभाग आणि विदर्भ :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्वच जिल्ह्यांत कोरडं हवामानाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, यवतमाळ,अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने थंडीचा इशारा दिला आहे.










