पुण्याची गोष्ट : पांडुरंगा... वारकऱ्यांच्या दिंडीत थेट कंटेनर शिरला, मुंबई-पुणे महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू
पुण्याची गोष्ट : कार्तिकी एकादशिच्या पवित्र वारीसाठी गेलेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत घाटात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई-पुणे महामार्गावरीव अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू
नेमकं काय घडलं?
पुण्याची गोष्ट : कार्तिकी एकादशिच्या पवित्र वारीसाठी गेलेल्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत घाटात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आठ वारकरी गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी सोमवारी घडली आहे. संबंधित अपघातातील
मृतांची नावे आता समोर आली आहे.
हे ही वाचा : बोरिवलीतील सुधीर फडके पुलाखाली नराधमानं महिलेला ओढून नेलं, नंतर तिचं लैंगिक शोषण करत... चीड आणणारा प्रकार
अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू
दावजी पाटील यांची दिंडी ही उरणहून मुंबई-पुणे महामार्गावरून आळंदीच्या दिशेने सकाळी जात होती. त्याचक्षणी चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीतच घुसला होता. या कंटेनरच्या धडकेत दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी या अपघातानंतर बचावकार्य सुरु केले होते.
काही वर्षांपासून याच महामार्गावर अशा अनेक घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी याच महामार्गावर बोलेरे हे चारचाकी वाहन दिंडीत घुसल्याने भीषण अपघात झाला होता. तेव्हा वारकऱ्यांनी सुऱक्षेची मागणी केली होती. काही दिवस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, पण नंतर पुन्हा वारकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.










