तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, राणा जगजितसिंह पाटलांचं निवडणुकीआधी तगडं प्लानिंग
Santosh Parmwshwar drugs : तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत हातात कमळ घेतलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने हातात घेतलं कमळ
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी
Santosh Parmwshwar : गणेश जाधव - तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत हातात कमळ घेतलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या भाजपच्या प्रवेशाने तुळजापुरचं राजकीय समीकरणात काहीअंशी फरक पडण्याची चिन्हे आहेत. यामुळे तुळजापूरच्या राजकारणात फरक पडेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे ही वाचा : Weather update : राज्यात 'या' भागात वाहणार थंड वारे, तापमानाचा पारा झटकन घसणार!
ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने हातात घेतलं कमळ
विधानसभा निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे उमेदवार असलेल्या धीरज पाटील यांना संतोष परमेश्वर यांची चांगली साथ लाभलेली होती. त्यानंतर संतोष परमेश्वर यांनी भाजपात प्रवेश केल्याने तूळजापुरातील स्थानिक राजकीय चित्र थोडंसं वेगळं राहण्याची चर्चा आहे. परमेश्वर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून तुळजापूर नगराध्यक्षपद भूषविले होते. दरम्यान, आता परमेश्वर यांचा भाजपात प्रवेश झाल्याने अनेकांनी त्यांच्यावर ड्रग्स प्रकरणावरून टीकेचे असुड ओढले आहेत.
'ड्रग्स प्रकरणातील आरोपीला पक्षात घेऊन भाजपने चुकीचा संदेश दिला आहे.'तर दुसरीकडे समर्थकांकडून 'संतोष परमेश्वर यांना राजकीय कमात फसवले गेले आणि आता नवा अध्याय सुरु केला', असं म्हणत आरोप जळजळीत आरोप केले आहेत.
हे ही वाचा : Delhi Blast नंतर ऑपरेशन सिंदूर-2?, PM मोदींच्या मनात नेमकं काय.. 'या' बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी
याचपार्श्वभूमीवर तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ड्रग्ज प्रकरण हा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे. तसेच विरोधक हा मुद्दा जोरदारपणे लावून धरण्याची शक्यता आहे. तुळजापूर नगरपरिषेद निवडणुकीत पुन्हा एकदा राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे सोमोरासमोर येऊन निवडणुकीतील रंगत वाढवण्याची चिन्हे आहेत.










