Praveen Pawar daughter Wedding : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे तीन एकत्र बसलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्योगपती, सत्ताधारी आणि विरोधक एकाच ठिकाणी एकत्र आल्याने या फोटोची तुफान चर्चा आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा हा फोटो IPS प्रवीण पवार यांच्या मुलीच्या लग्नातील आहे.. हा फोटो नीट पाहिला तर.. शरद पवार आणि गौतम अदानी हे सोफ्यावर बसलेले आहेत.. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे दुसऱ्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत.
IPS अधिकारी प्रवीण पवार कोण?
प्रवीण पवार हे IPS आहेत. त्यांनी राज्यातील विविध भागात पोलीस विभागात सेवा बजावली आहे. कधी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त तर कधी पुण्याचे सहआयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलंय. प्रवीण पवार यांची कन्या प्राजक्ता हिचा हिमांशू सोबत विवाह सोहळा पार पडला. या नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यासाठी फडणवीस, पवार आणि अदानी सोबत असल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा : खडसेंचं ऐकलं असतं तर पार्थ प्रकरण आलंच नसतं! अचानक एंट्री झालेला हेमंत गावंडे आहे तरी कोण?
काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंकडून गौतम अदानींवर आरोप, पण पवारांची जवळीक
एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नरेंद्र मोदी आणि भाजपवर गौतम अदानींवरुन टीका करत असताना इंडिया आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे मात्र वारंवार गौतम अदानींसोबत विविध कार्यक्रमात एकत्रित येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी देखील गौतम अदानी यांच्यावर आरोप केले आहेत. याआधी देखील काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि गौतम अदानी हे सुशीलकुमार शिंदे यांच्या नातीच्या विवाहपूर्वीच्या लग्नसमारंभात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं.
तसेच गौतम अदानी यांनी शरद पवार यांची मुंबईतल्या घरी भेट घेतली तर कधी बारामतीतल्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे काँग्रेसचे नेते, उद्धव ठाकरे यांच्याकडून अदानींवर टीका केली जात असताना दुसरीकडे पवार आणि अदानी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











