तुळजापूरः Drugs प्रकरणातील आरोपीचा चक्क भाजपमध्ये प्रवेश, राणा पाटलांच्या खेळीने फडणवीसांची अडचण; सुप्रिया सुळेंनी तर थेट...
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने भाजप आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केल्याने फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरु आहे.
ADVERTISEMENT

गणेश जाधव, तुळजापूरः तुळजापुरचं ड्रग्ज प्रकरण राज्यभरात गाजलं. अगदी लोकसभा, विधानसभेतही आवाज उठवला गेला. पण याच प्रकरणातल्या आरोपीनं आता चक्क भाजपमध्ये प्रवेश केलाय. ज्यावरुन राजकारण तापलंय.
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्रही लिहिलंय.यावरुन आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. आधी हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण पाहूयात.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
संतोष परमेश्वर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि तुळजापूर नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते. या प्रकरणात पोलीस तपास सुरू असून, आता ते जामिनावर बाहेर आहेत. बरं ज्या राणा पाटलांच्या हातून त्यांनी प्रवेश केला त्याच पाटलांवर हे कदम भरभरुन टीका करत होते.










