खडसेंचं ऐकलं असतं तर पार्थ प्रकरण आलंच नसतं! अचानक एंट्री झालेला हेमंत गावंडे आहे तरी कोण?

निलेश झालटे

पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणानंतर हेमंत गावंडे हे नाव अचानक चर्चेत आलं. जाणून घ्या त्यांची या सगळ्या वादात एंट्री का झालीये.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणेः पार्थ पवारांचं जमीन प्रकरण गाजतंय. यावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत, या प्रकरणात अनेक नावं समोर आली. यात आता एका माणसाची एन्ट्री झालीय, ज्याच्यामुळं भरपूर खाती असलेलं मंत्रिपद एकनाथ खडसेंना सोडावं लागलेलं, त्यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिलेला. वर्ष 2016… जूनचा महिना, प्रचंड आरोप-प्रत्यारोपानंतर एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला आणि हा राजीनामा खडसेंचं राजकीय करिअर संपवणारा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.

खडसेंचा राजीनामा होण्यामागे कोण होतं? यावरुन राजकीय आरोप बरेच झाले, स्वतः खडसेंनी देखील यावर क्लिअॅरिटी दिली आहेच. मात्र एका व्यक्तिच्या तक्रारीमुळं खडसेंना घरी जावं लागलं. ही तक्रार खडसेंच्या राजीनाम्याचं कारण ठरलं. ही तक्रार होती हेमंत गावंडेंची.  हेच हेमंत गावंडे ते व्यक्ती आहेत ज्यांनी यापूर्वी एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावली होती. त्यांच्या खुलाशांमुळे त्यावेळी खडसेंचं मंत्रीपद गेलं होतं. आता हेच गावंडे पार्थ पवार प्रकरणात देखील चर्चेत आलेत. आणि त्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण देखील लागण्याची शक्यता आहे. यामुळं खडसे देखील समोर आलेत आणि त्यांनी धक्कादायक आरोप केलेत.

एकंदरीतच पार्थ पवार प्रकरणात गावंडेंची एन्ट्री काय सांगतेय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ अजित पवार या नावाची चर्चा आहे. पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत आहे. 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींना कशी मिळाली? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप केले गेलेत आणि हा व्यवहार रद्द झाला असल्याचं देखील समोर आलंय. पण व्यवहार रद्द झाला म्हणजे प्रकरण संपलं असं नाही, याचे वेगवेगळे पदर आता समोर येत आहेत आणि येतील सुद्धा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp