Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये पुन्हा येणार NDA सरकार, पाहा सगळ्या Exit Poll चे आकडे
Bihar Election Exit Poll Results 2025: 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी मतदान संपले आहे. यावेळी, विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, आता एक्झिट पोलचे आकडे हे समोर येऊ लागले आहेत. जाणून घ्या अचूक एक्झिट पोल डेटा.
ADVERTISEMENT

Bihar Election Exit Poll 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज (11 नोव्हेंबर) मतदान पार पडलं. यंदा बिहारमध्ये विक्रमी मतदान झालं आहे. आता, विविध टीव्ही चॅनेल आणि एजन्सींनी त्यांचे एक्झिट पोल निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्या एक्झिट पोलबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
243 जागांच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख सर्वेक्षण संस्था त्यांचे जागांचे अंदाज जाहीर करत आहेत. हे एक्झिट पोल जनतेच्या भावना आणि संभाव्य निकालांचे प्रारंभिक चित्र प्रदान करतील. यावरून नितीश कुमार राज्यात पुन्हा सरकार स्थापन करतील की तेजस्वी यांच्या नेतृत्वाखाली बदल होईल हे स्पष्ट होईल. पण, खरे चित्र 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी, निकाल अधिकृतपणे जाहीर झाल्यावरच स्पष्ट होईल.
बिहार एक्झिट पोल २०२५: JVC पोलमध्ये एनडीएला मोठी आघाडी
JVC च्या एक्झिट पोलमध्ये NDA ला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. NDA ला 135-150 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला 88-103 जागा मिळतील, तर इतरांना 3-6 जागा मिळतील.
MATRIZE-IANS चा एक्झिट पोल
MATRIZE-IANS एक्झिट पोलमध्ये NDA ला 48 टक्के, महाआघाडीला 37 टक्के आणि इतरांना 15 टक्के मते मिळतील असे दिसून आले आहे. याचा अर्थ NDA ला लक्षणीय फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. NDA ला 147-167 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला 70-90 जागा मिळण्याचा अंदाज आहे.










