Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत कोरडं हवामान, काही ठिकाणी अंगाला बोचणार थंडी
Maharashtra Weather : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच जाणून घेऊयात 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात तापमानात घट
'या' जिल्ह्यांत थंडी वाढण्याची चिन्हे
Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पावसाचे वातावरण होते. दिवाळी सणानंतर ऋतुमानानुसार हवामानात बदल झाला आणि थंड वारे वाहू लागले. तसेच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच जाणून घेऊयात 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : वॉर्ड OBC साठी राखीव, तेजस्वी घोसाळकरांना निवडणूक लढता येईना, फेसबुक पोस्टने वेधलं लक्ष
कोकण विभाग :
कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईचा समावेश आहे. या ठिकाणी कोरडे वातावरण राहणार आहे. तसेच तापमानात काही प्रमाणात घट राहू शकते.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांमध्ये देखील हवामान विभागाने कोरडं हवामान राहील असा अंदाज वर्तवला आहे. याच भागांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली. या जिल्ह्यांचा समावेश होतो, या भागात तापमानात घट होऊन थंडीचं प्रमाण असेल असा हवामानाचा अंदाज आहे.










