Delhi Blast: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने कार स्फोटात गमावली जवळची व्यक्ती! म्हणाली, "माझ्या कुटुंबाचा भाग..."
बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने दिल्ली स्फोट प्रकरणाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, दिल्लीत झालेल्या कार ब्लास्टमध्ये तिच्या जवळच्या व्यक्तीला जीव गमवावा लागला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने कार स्फोटात गमावली जवळची व्यक्ती!
दिल्ली कार स्फोट प्रकरणाबाबत नेमकं काय म्हणाली?
Delhi Blast Update: 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटानंतर याबाबत आता बऱ्याच बाबी समोर येत आहे. या i20 कार स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच, या भीषण स्फोटात बरेच जण जखमी झाले. आता, बॉलीवूड अभिनेत्री पायल घोषने याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, दिल्लीत झालेल्या कार ब्लास्टमध्ये तिची जवळची आणि शाळेतील मैत्रीण सुनीता मिश्रा हिला जीव गमवावा लागला.
पायल घोष काय म्हणाली?
अभिनेत्री पायलला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. तिने तिची मैत्रीण सुनीतासोबत झालेल्या शेवटच्या बोलण्याबद्दल सांगितलं. घटनेच्या एक आठवड्यापूर्वी दोघांमध्ये बोलणं झालं होतं. 'बॉलीवूड बबल'शी बोलताना पायल म्हणाली की, सुनीता आता आपल्यात नाही, या गोष्टीवर मला आता सुद्धा विश्वास बसत नाहीये. खरं तर, सुनीता नेहमी आनंदी असायची आणि सगळीकडे सकारात्मकता पसरवायची. इतक्या चांगल्या दयाळू व्यक्तीचा अशा पद्धतीने मृत्यू व्हावा, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे."
हे ही वाचा: Delhi Blast: तपासात उघड झाली अत्यंत मोठी माहिती, ‘ती’ गोष्ट झाली नसती तर अत्यंत भयंकर…
पीडितांच्या कुटुंबियांना अनुदान जाहीर
सुनीतासोबतच्या आपल्या नात्याबद्दल पायल म्हणाली की, "सुनीता फक्त मैत्रीण नव्हती, तर ती माझ्या कुटुंबाचा भाग होती. आम्ही सोबतच मोठ्या झालो. एकमेकांचा आनंद, स्वप्ने आणि संघर्ष एकत्र पाहिला आहे. तिचं अशाप्रकारे निघून जाणं, यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत." पायलने जनतेला या कठीण काळात पीडितांच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. संबंधित घटनेला प्रतिसाद म्हणून, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पीडितांच्या कुटुंबियांना अनुदान जाहीर केलं आहे. त्यांनी सांगितलं की, या स्फोटात ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये, तसेच कायमचे अपंगत्व किंवा गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये मिळतील.
हे ही वाचा: Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोटाच्या 30 मिनिटं आधी i20 कार कुठे आणि कशी वळणं घेत होती?, पाहा 3D रिकंस्ट्रक्शन
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपल्या X अकाउंटवर सांगितलं की, "या कार स्फोटात ज्यांनी आपले जवळचे लोक किंवा कुटुंबीय गमावले आहेत आणि जखमी झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांबद्दल दिल्ली सरकार सहानुभूती व्यक्त करते." सोमवार, संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला, यामध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतातील मुख्य शहरांमध्ये सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणातील तपासात जम्मू आणि काश्मीरशी दहशतवादी संबंध असल्याचं उघड झालं आहे.










