Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोटाच्या 30 मिनिटं आधी i20 कार कुठे आणि कशी वळणं घेत होती?, पाहा 3D रिकंस्ट्रक्शन
इंडिया टुडेच्या ओपन सोर्स इन्व्हेस्टिगेशन टीम (OSINT) ने सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे अहवाल आणि अधिकृत माहितीच्या आधारे स्फोटापूर्वीच्या 30 मिनिटांचा कारचा प्रवास ट्रेस केला आहे. पाहा ती कार नेमकी कुठून कशी आली होती.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात आता असे उघड झाले आहे की संशयित हल्लेखोरांनी जाणूनबुजून लाल किल्ल्याच्या सर्वात जवळचे ठिकाण निवडले होते. जिथे गर्दीच्या बाजारपेठा आणि मंदिरे देखील जवळ होती. इंडिया टुडेच्या ओपन-सोर्स इंटेलिजेंस (OSINT) टीमने सीसीटीव्ही फुटेज, अधिकृत अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींच्या अहवालांच्या आधारे कारचा संपूर्ण मार्ग पुन्हा ट्रेस केला आहे.
नेमकी कार कुठे, कशी आणि कधी घेत होती Turn?
टीमच्या म्हणण्यानुसार, i20 कार सुनेहरी मस्जिद पार्किंग लॉटमधून लाल किल्ल्याकडे जात असताना, दिगंबर जैन मंदिर आणि गौरी शंकर मंदिराच्या अगदी जवळून गेली, परंतु कोणत्याही ठिकाणी थांबली नाही. त्यानंतर गाडी गर्दीने भरलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळून गेली.
हे ही वाचा>> Delhi Blast: डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची A-47, कोण आहे 'ही' भयंकर महिला?
सीसीटीव्ही फुटेजनुसार, गाडी सुनेहरी मस्जिदमधून संध्याकाळी 6:22 वाजता निघाली आणि घटनेच्या सुमारे 30 मिनिटांनी संध्याकाळी 6:52 वाजता स्फोट झाला.
स्फोटापूर्वी, कारने सुमारे 400 मीटर पुढे यू-टर्न घेतला, ज्यामुळे ती लाल किल्ल्याजवळ जाऊ शकली. असे मानले जाते की, खाजगी वाहनांनी जाणाऱ्या लाल किल्ला संकुलाच्या सर्वात जवळच्या ठिकाणी स्फोट व्हावा यासाठी यू-टर्न हे एक योग्यरितीने आखलेला कट होता.










