Delhi Blast: डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची A-47, कोण आहे 'ही' भयंकर महिला?
दिल्लीतील भीषण स्फोटापूर्वी तीन डॉक्टरांसह सात संशयितांना अटक करण्यात आली होती. यामध्ये महिला डॉक्टर शाहीन शाहिदचा सुद्धा समावेश आहे. या महिला डॉक्टरचा जैश या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डॉ. शाहीन शाहीद कारमध्ये ठेवायची A-47...
दहशतवादी संघटनेशी संबंध असलेली 'ही' भयंकर महिला कोण आहे ?
Delhi Car Blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. संबंधित कार ब्लास्टची माहिती मिळताच, दिल्ली पोलिसांसह केंद्रीय एजन्सीसुद्धा अलर्ट झाल्याचं दिसून येत आहे. आता या घटनेचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासले जात आहे. तसेच, या ब्लास्टचा पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं समोर येत आहे. तसेच, फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी देखील याचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. या भीषण स्फोटापूर्वी तीन डॉक्टरांसह सात संशयितांना अटक करण्यात आली होती. यामध्ये महिला डॉक्टर शाहीन शाहिदचा सुद्धा समावेश आहे. या महिला डॉक्टरचा जैश या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याचं सांगण्यात येत आहे.
डॉक्टर शाहीनचे जैश संघटनेशी थेट संबंध
या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवत-उल-हिंदशी संबंधित एका 'व्हाइट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचाही पर्दाफाश झाला आहे. यावरून, अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचे जैश या संघटनेशी थेट संबंध असल्याचं स्पष्ट होत आहे. डॉक्टर शाहीन ही जैशच्या जमात उल मोमिनत या महिला विंगमध्ये भारताची प्रमुख म्हणून काम करत होती. भारतातील दहशतवादी गटात जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेणे, हेच तिचं ध्येय होतं.
शाहीनच्या कारमधून AK-47 रायफल जप्त
या डॉक्टर शाहीनच्या अटकेमुळे मोठ्या कटाचा पर्दाफाश होणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शाहीन ही लखनऊ येथील रहिवासी असून तिला काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये तिच्या संशयित भूमिकेसाठी म्हणजेच तिच्या सहभागासाठी अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, संबंधित महिला डॉक्टराच्या कारमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा: Delhi Blast: 'त्या' दिवशी i20 कारमध्ये होते तिघे जणं, दिल्ली स्फोटातील कारचा नवा Video पोलिसांच्या हाती
शाहीनसह आणखी सात जणांना अटक
या प्रकरणाशी डॉ. शाहीन या एकट्या महिलेचा संबंध नसून तिच्यासोबत वेगवेगळ्या भागातून आणखी सात जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत महिती देताना सांगितलं की, यामध्ये फरीदाबाद येथे राहणारा काश्मिरचा रहिवासी डॉ. मुझम्मिल गनी याचाही समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईत 2900 किलो विस्फोटके जप्त करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलीस दलांसह केंद्रीय एजन्सींच्या संयुक्त तपासात मोठं यश मिळालं असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच, लेडी डॉक्टर शाहीनला अटक केली असून तिला चौकशीसाठी श्रीनगरला आणण्यात आलं.










