Delhi Blast: 'त्या' दिवशी i20 कारमध्ये होते तिघे जणं, दिल्ली स्फोटातील कारचा नवा Video पोलिसांच्या हाती
दिल्ली स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाच्या i20 कारच्या तपासात नवीन व्हिडिओ समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही कार नुकतीच विकली गेली होती आणि 29 ऑक्टोबर रोजी या कारमधून 3 जण प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. तपास यंत्रणांना आता स्फोटात वापरल्या गेलेल्या i20 कारचा (HR 26 CE 7674) नवा व्हिडिओ मिळाला आहे. हा व्हिडिओ स्फोटाच्या काही दिवस आधी म्हणजे 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजून 20 मिनिटांचा आहे.
स्फोट झालेल्या कारचा नवा व्हिडिओ आला समोर
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, प्रदूषण चाचणी केंद्रात (PUC) गाडी आली तेव्हा कारमध्ये तीन लोक बसलेले होते. ही कार त्याच दिवशी, म्हणजे 29 ऑक्टोबर 2025 रोजी खरेदी करण्यात आली होती आणि त्याच दिवशी तिचे PUC प्रमाणपत्र देखील अपडेट करण्यात आले होते. तपास यंत्रणांना संशय आहे की, हे तिघेही व्यक्ती स्फोट मॉड्यूलशी संबंधित असू शकतात.
हे ही वाचा>> दिल्लीत झालेल्या स्फोटात भाजप नेत्याचा मुलगा जखमी, कुटुंबीयांनी सांगितली स्फोटाची कहाणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबाद आणि दिल्ली पोलिसांचे पथक तिघांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत आणि आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासत आहेत. स्फोटात वापरलेल्या i20 कारच्या नोंदणी तपशीलांची आणि अलीकडील व्यवहारांची देखील चौकशी केली जात आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर, प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आले आहे. सुरुवातीच्या तपासात फरीदाबादमधील एका मॉड्यूल आणि काही वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेली नावे उघड झाली आहेत, ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे.










