वडील हयात नाहीत, आईला कॅन्सर; धंद्यासाठी कपड्यांची खरेदी करायला गेला अन् दिल्ली ब्लास्टमध्ये...

मुंबई तक

Shiva Jaiswal injured in Delhi Car blast : वडील हयात नाहीत, आईला कॅन्सर; 4 बहिणींना एकुलता एक भाऊ, दिल्ली ब्लास्टमध्ये जखमी झालेल्या शिवाची कहाणी

ADVERTISEMENT

Shiva Jaiswal injured in Delhi Car blast
Shiva Jaiswal injured in Delhi Car blast
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वडील हयात नाहीत, आईला कॅन्सर; 4 बहिणींना एकुलता एक भाऊ

point

दिल्ली ब्लास्टमध्ये जखमी झालेल्या शिवाची कहाणी

Shiva Jaiswal injured in Delhi Car blast :  दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी शिवा जयस्वाल यांचाही समावेश आहे. बाजारात रेडीमेड कपड्यांचे दुकान चालवणारे शिवा जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला काल रात्री टीव्हीवरील बातम्यांमधून मिळाली. बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने दिल्लीकडे प्रयाण केले.

एकुलता एक भाऊ जखमी झाल्याने कुटुंब हादरले

शिवा जयस्वाल जखमी झाल्याच्या बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवा हे घरातील एकुलतेच पुत्र असून त्यांच्या चार बहिणींचे लग्न झालेले आहे. वडील आता हयात नाहीत आणि आई माया जयस्वाल कॅन्सरग्रस्त आहेत. त्या भाजपच्या स्थानिक नेत्या देखील आहेत.

शिवाच्या बहीण रंजन जायसवाल यांनी सांगितले की, भाऊ 9 नोव्हेंबरच्या रात्री व्यवसायाच्या कामानिमित्त बसने दिल्लीला गेले होते. त्यांच्या जखमी झाल्याची माहिती कुटुंबाला टीव्हीद्वारे मिळाली. शिवाची रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे आणि नवीन कपड्यांचा माल खरेदी करण्यासाठी ते दिल्लीला गेले होते.

हेही वाचा : 'दिल्ली Bomb Blast'शी 'या' 4 डॉक्टरांचं कनेक्शन! दहशतवादी संघटनांशी संबंध, घातक रसायने अन् विस्फोटके...

हे वाचलं का?

    follow whatsapp