महाडमध्ये तटकरेंची मोठी खेळी, सुशांत जाबरेंना मोठं पद देत भरत गोगावलेंना शह

मुंबई तक

महाडच्या सुशांत जाबरे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्षपद देत NCP चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे मंत्री आणि महाडचे आमदार भरत गोगावलेंना शह दिला आहे.

ADVERTISEMENT

sunil tatkare big move in mahad giving sushant jabare a big post in ncp puts bharat gogawale in trouble
सुशांत जाबरेंची NCP उपाध्यक्षपदी नियुक्ती
social share
google news

महाड: महाड तालुक्यातील उदयोन्मुख युवा नेता आणि कुणबी समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व सुशांत गणेश जाबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही आठवड्यांतच मिळालेलं हे उच्च पद राष्ट्रवादीच्या धोरणात्मक रणनीतीचा भाग असल्याचं मानलं जात आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली, ज्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे विश्वासू असी ओळख असलेल्या जाबरेंना NCP मध्ये घेत मोठी जबाबदारी दिल्याने हा गोगावलेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नियुक्तीची पार्श्वभूमी आणि राजकीय महत्त्व

महाडसह रायगड जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय अत्यंत अर्थपूर्ण आहे. सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महाड तालुक्यात संघटन पुन्हा मजबूत करण्याची मोहीम हाती घेतली असून, सुशांत जाबरे यांच्या नियुक्तीला त्या प्रयत्नांचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तटकरे यांनी ही चाल रणनीतीपूर्वक खेळली आहे.

जाबरे यांच्या नियुक्तीमुळे महाडच्या राजकीय समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल घडण्याची शक्यता आहे. विशेषत: आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला स्थानिक पातळीवर नव्या जोमाने उभारी मिळू शकते. ही नियुक्ती केवळ वैयक्तिक यश नसून, पक्षाच्या युवा धोरणाचा भाग असल्याचं पक्षातील सूत्रांनी सांगितलं.

सुशांत जाबरे: उदयोन्मुख युवा चेहरा

सुशांत जाबरे हे गेल्या काही वर्षांत महाड तालुक्यातील युवकांमध्ये लोकप्रिय झालेले नाव आहे. सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि संघटन कौशल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच स्थानिक राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कुणबी समाजातील मजबूत पाठबळ आणि तरुणांमध्ये त्यांची चांगली पकड आहे. जाबरे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत राज्यस्तरीय जबाबदारी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp