Govt Job: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी निघाली भरती... काय आहे पात्रता?
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एकूण 290 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी!
मोठ्या पदांसाठी निघाली भरती...
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Govt Job: महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एकूण 290 पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार mjp.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 19 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
'या' पदांसाठी निघाली भरती
या अंतर्गत उमेदवारांची बऱ्याच पदांवर भरती केली जाणार असून यामध्ये जुनिअर इंजिनीअर (सिव्हिल) ची सर्वाधिक म्हणजेच 144 पदे, सिव्हिल इंजिनीअर असिस्टंटची 48 पदे, जुनिअर क्लर्क/ क्लर्क टायपिस्टची 46 पदे आणि जुनिअर इंजिनीअर (मॅकेनिकल) ची 16 पदे समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, अकाउंट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, स्टेनोग्राफर, असिस्टंट स्टोरकीपर आणि इंतर पदांवर सुद्धा भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. काही पदांसाठी B.Com, B.E. किंवा B.Tech डिग्री अनिवार्य आहे. तसेच, काही पदांवर नियुक्त होण्यासाठी डिप्लोमा, 10 वी उत्तीर्ण अशा संबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन तपासणं गरजेचं आहे.
हे ही वाचा: व्यवसायात चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष! ठाण्यातील व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक...
किती मिळेल वेतन?
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन दिलं जाईल. इंटरनल ऑडिट ऑफिसर किंवा सीनियर अकाउंट्स ऑफिसर यांसारख्या उच्च पदांसाठी दरमहा 56,100 ते 1,77,500 पगार देण्यात येईल. तसेच, जुनिअर इंजिनीअर (सिव्हिल/मॅकेनिकल) आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर पदांसाठी दरमहा 38,600 से 1,22,800 वेतन दिलं जाईल. याशिवाय, जूनियर क्लर्क आणि असिस्टंट स्टोरकीपर साठी 19,900 ते 63,200 रुपये तसेच, सिव्हिल इंजिनीअरिंग असिस्टंट पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 पगार दिला जाईल.










