व्यवसायात चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष! ठाण्यातील व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक...
एका व्यावसायिकाला नारळाचा बिझनेस वाढवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
व्यवसायात चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष!
ठाण्यातील व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक...
Thane Crime: ठाण्यातील वर्तक नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यावसायिकाला नारळाचा बिझनेस वाढवण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी मिळून 50 वर्षीय पीडित व्यावसायिकाची तब्बल 16.82 रुपयांसाठी फसवणूक केली. आरोपींनी पीडित व्यापाराला त्याच्या नारळाच्या व्यावसायात मोठा फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि पार्टनरशिपचा प्रस्ताव ठेवून त्याच्याकडून मोठ्या रकमेची गुंतवणूक करवून घेतली.
चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष...
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान पीडित व्यवसायिकाची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी दक्षिण भारतातील नारळांचा मोठा साठा आहे असून तो स्थानिक बाजारात ते विकून चांगला नफा मिळवू शकत असल्याचं पीडित व्यापाऱ्याला असे सांगून त्याला जाळ्यात अडकवलं. या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने 16 लाख रुपये आरोपींच्या खात्यात गुंतवले.
हे ही वाचा: 'दिल्ली Bomb Blast'शी 'या' 4 डॉक्टरांचं कनेक्शन! दहशतवादी संघटनांशी संबंध, घातक रसायने अन् विस्फोटके...
आरोपींनी सुरूवातीला थोडी रक्कम दिली अन्...
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की, पीडित व्यक्तीने पैसे गुंतवल्यानंतर आरोपींनी पीडित व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला 1.59 लाख रुपये दिले, यामुळे व्यावसायिकाला आरोपींवर विश्वास बसला. मात्र, जेव्हा त्याने आरोपींकडे उर्वरित पैसे आणि नफा मागितला तेव्हा आरोपींनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
हे ही वाचा: नातेवाईकाला स्टेशनवर सोडायला गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, दिल्ली कार स्फोटात बिहारच्या पंकजचा दुर्दैवी मृत्यू!
प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल
यानंतर, पीडित व्यावसायिकाने वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता चार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 406 ( विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप, कोणत्याच आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली नसून त्यांचा शोध घेण्यास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे गुंतवणूक करून पीडितांच्या फसवणूकीचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळतंय.










