Delhi Blast: स्फोटाआधी डॉ. उमरने केलेला 'भाभीला' फोन... दोघांमधलं 'ते' बोलणं आलं समोर?

मुंबई तक

तपासादरम्यान, ही कार चालवणाऱ्या डॉ. उमरबद्दल सुद्धा बऱ्याच बाबी उघडकीस येत आहेत. हा स्फोट होण्यापूर्वी डॉ. उमरने 'भाभीला' फोन केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

डॉ. उमरने केलेला 'भाभीला' फोन...
डॉ. उमरने केलेला 'भाभीला' फोन...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्फोटाआधी डॉ. उमरने केलेला 'भाभीला' फोन...

point

दोघांमधलं 'ते' बोलणं आलं समोर?

Delhi Blast Update: सोमवारी दिल्लीत झालेल्या i20 कार स्फोटाबाबत बरेच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासादरम्यान, ही कार चालवणाऱ्या डॉ. उमरबद्दल सुद्धा बऱ्याच बाबी उघडकीस येत आहेत. उमरचे वडील गुलाम नबी भट, त्यांची दोन मुलं आशिक हुसैन आणि जहूर इलाही यांची पोलीस चौकशी करण्यात आली. तपासासाठी उमरच्या आईचं डीएनए सॅम्पल सुद्धा घेण्यात आलं आहे. 

उमरच्या वहिनीने नेमकं काय सांगितलं?   

उमरची वहिनी मुजमिला अख्तर याबद्दल म्हणाली की, "सोमवारी रात्री पोलिसांच्या गाड्या आल्या. त्यांनी आधी जहूरला त्यांच्यासोबत नेलं. काही वेळानंतर, माझे पती आशिकला घेऊन गेले. त्यांचे मोबाईल सुद्धा पोलिसांनी सोबत घेऊन गेले." तसेच, ती म्हणाली "उमरने शुक्रवारी मला फोन केला होता. त्यावेळी, त्याने तो लायब्ररीमध्ये परीक्षेचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं. मी त्याला म्हणाले की घरी ये, तेव्हा तीन दिवसांमध्ये येतो, असं म्हणून त्याने फोन ठेवला."

नीट-पीजी परीक्षेत राज्यातील टॉपर्समध्ये समावेश

डॉ. उमर नबी भट हा पुलवामातील कोइल गावचा रहिवासी असून त्याने श्रीनगरमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) मधून एमबीबीएस आणि एमडी शिक्षण पूर्ण केलं. नीट-पीजी परीक्षेत राज्यातील टॉपर्समध्ये त्याचा समावेश होता. एमडी केल्यानंतर, त्याने जीएमसी अनंतनाग रुग्णालयात काम केलं आणि त्यानंतर दीड वर्षांपूर्वी तो हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाला. त्याचं श्रीनगरच्या एका महिला डॉक्टरसोबत लग्न ठरलं होतं. 

हे ही वाचा: Delhi Blast: डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध! पतीपासून घेतला घटस्फोट, डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

'व्हाइट कॉलर' नेटवर्कचा सूत्रधार असल्याचा संशय 

पोलिसांच्या माहितीनुसार, उमर 'व्हाइट कॉलर ग्रुप'मध्ये समाविष्ट होता होता. म्हणजेच ते दहशतवाद्यांना मदत करणारं सुशिक्षित तरुणांचं एक मॉड्यूल होतं. उमर हा या नेटवर्कचा सूत्रधार असल्याचा पोलिसांना संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी फरिदाबादमध्ये डॉ. मुझम्मिल अहमद गनई याला अटक केली असता त्यावेळी उमरचं नाव समोर आल्याचं तपासात उघडकीस आलं. चौकशीदरम्यान, मुझम्मिलने पोलिसांना स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा असलेल्या ठिकाणी नेलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp