Delhi Blast: उमरची दुसरी कार पण सापडली, आजूबाजूचा परिसर केला तात्काळ रिकामा

मुंबई तक

दिल्ली स्फोट प्रकरणातील संशयित आरोपी, फरिदाबाद पोलिसांनी लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट कार (DL10CK0458) जप्त केली आहे. ही कार उमर उन नबी उर्फ उमर मोहम्मद याच्या नावाने नोंदणीकृत आहे.

ADVERTISEMENT

delhi blast umar second car was also found surrounding area was immediately evacuated
delhi blast
social share
google news

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील झालेल्या स्फोट प्रकरणी आता तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. फरिदाबाद पोलिसांनी आज (12 नोव्हेंबर) लाल रंगाची फोर्ड इको स्पोर्ट (Ford Eco Sport) कार (DL10CK0458) सापडली आहे. खंदावली गावाजवळ ही कारण जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही तीच कार आहे ज्याच्या नावावर दिल्ली पोलिसांनी अलर्ट जारी केला होता.

ही कार ताब्यात घेण्यात आली आहे आणि सध्या ती जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि इतर केंद्रीय एजन्सींना या कारबाबत माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केला आहे.

हे ही वाचा>> Delhi Blast: स्फोटाआधी डॉ. उमरने केलेला 'भाभीला' फोन... दोघांमधलं 'ते' बोलणं आलं समोर?

पोलिसांना सापडली उमरची फोर्ड इको स्पोर्ट कार

22 नोव्हेंबर 2017 रोजी दिल्लीतील राजौरी गार्डन RTO मध्ये ही कार नोंदणीकृत होती. तपासात असे दिसून आले की, ही कार उमर उन नबी उर्फ उमर मोहम्मद याच्या नावाने खरेदी करण्यात आली होती, जो दिल्ली बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयितांपैकी एक आहे.

गाडी जप्त करून पाठवली फॉरेन्सिक तपासणीसाठी

पोलिसांच्या मते, उमर मोहम्मदने गाडी खरेदी करताना बनावट पत्ता वापरला होता. कागदपत्रांवर त्याने ईशान्य दिल्लीतील एका घराचा पत्ता दिला होता. दिल्ली पोलिसांनी काल (11 नोव्हेंबर) रात्री उशिरा त्याच पत्त्यावर छापा टाकला, परंतु तेथे कोणीही सापडले नाही. तपास यंत्रणा आता खंदावली गावात गाडी कोणी आणि कधी सोडली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp