भाजपची नवखी उमेदवार मैथिली ठाकूर होणार पराभूत, Exit Poll मध्ये धक्कादायक निकाल!

मुंबई तक

बिहारच्या निवडणुकीत भाजपने अत्यंत नवख्या अशा मैथिली ठाकूर हिला अलीनगर मतदारसंघातून विधानसभा तिकीट दिलं. मात्र एक्झिट पोलनुसार मैथिली ठाकूर हिला पराभवाचा झटका बसू शकतो.

ADVERTISEMENT

bjp very new candidate maithili thakur will be defeated shocking results in bihar vidhansabha exit poll
Maithili Thakur/instagram
social share
google news

पटना: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज (11 नोव्हेंबर) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. ज्यानंतर आता वेगवेगळे  Exit Poll समोर येत आहेत. पण बिहार विधानसभेच्या 243 मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या अलिनगर विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे फक्त बिहारच नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण भाजपने या मतदारसंघातून अवघ्या 26 वर्षांची सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर हिला तिकीट दिलं होतं. याच मतदारसंघातील नेमका Exit Poll हा आता समोर आला आहे. जाणून घेऊया याचविषयी सविस्तर. 

दरभंगा जिल्ह्यात येणाऱ्या अलिनगर मतदारसंघातून यंदा भाजपकडून मैथिली ठाकूर निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघात मिश्रीलाल यादव हे आमदार होते. पण मैथिली ठाकूरला तिकीट देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

हे ही वाचा>> Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये पुन्हा येणार NDA सरकार, पाहा सगळ्या Exit Poll चे आकडे

दुसरीकडे राजदकडून विनोद मिश्रा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाकडून विप्लव चौधरी यांना तिकीट देण्यात आलं. पण मैथिली ठाकूर हिची प्रमुख लढत ही राजदच्या विनोद मिश्रा यांच्या विरुद्धच आहे.

मैथिली ठाकूरचं या निवडणुकीत काय होणार? याबाबतच सध्या बिहारमध्ये अधिक चर्चा आहे. बिहार निवडणूक जाहीर झाल्यानंतर मैथिली ठाकूरला भाजपमध्ये प्रवेश देऊन तात्काळ तिकीटही देण्यात आलं. मैथिली ठाकूरच्या प्रचारासाठी भाजपने या मतदारसंघात दिग्गजांना उतरवलं होतं. याच मतदारसंघात अमित शाहांची प्रचार रॅली देखील झाली. तसंच पंतप्रधान मोदींनी मैथिली ठाकूरच्या प्रचाराचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp