रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वादावर अजित पवारांचं सविस्तर भाष्य, म्हणाले...

Ajit Pawar on controversy between Rupali Chakankar and Rupali Thombre Patil : रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वादावर अजित पवारांचं सविस्तर भाष्य, म्हणाले...

Ajit Pawar on controversy between Rupali Chakankar and Rupali Thombre Patil

Ajit Pawar on controversy between Rupali Chakankar and Rupali Thombre Patil

मुंबई तक

13 Nov 2025 (अपडेटेड: 13 Nov 2025, 02:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्या वादावर अजित पवारांचं भाष्य

point

अजित पवार पक्षातील दोन महिला नेत्यांच्या वादावर काय म्हणाले?

Ajit Pawar on controversy between Rupali Chakankar and Rupali Thombre Patil : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या दोन महिला नेत्यांमध्ये गेल्या महिनाभरात मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यातील फटलणमध्ये एका महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यांच्या आत्महत्या केली. संबंधित महिला डॉक्टर म्हणजेच पीडितेबाबत चुकीची माहिती देऊन रुपाली चाकणकर यांनी तिचं चरित्रहनन करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला होता. याशिवाय ठोकरेंनी चाकणकर यांच्यावर अनेकदा टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं बोललं गेलं. दरम्यान, या दोन महिला नेत्यांच्या वादावर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे वाचलं का?

 चाकणकर आणि ठोंबरे पाटील यांच्या वादावर अजित पवार काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, मी रुपाली ताईंना भेटलो. त्यांच्याशी बोललो त्यावेळी अभय मांढरे देखील माझ्यासोबत होता. मी त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं आहे. तो आमच्या परिवारातील अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब आणि परिवार म्हणून सगळं पाहातो. त्यामुळे पत्रकारांना खमंग बातम्या मिळतील, अशी अपेक्षा ठेऊ नका. तुमच्यामध्ये वाद झाल्यावर तुम्ही ज्या पद्धतीने मिटवता, त्याच पद्धतीने मलाही माझ्या पक्षातील वाद मिटवावा लागेल. आम्ही पक्षातील निर्णय सर्वजण बसून घेतो.

हेही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'ती' मागणी अखेर मान्य

रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या भेटीबाबत बोलताना काय म्हणाले?

दरम्यान, अजित पवारांच्या भेटीवरुन रुपाली ठोंबरेंनी त्याच्या फेसबुक पोस्टवरुन स्पष्टीकर दिलं आहे. रुपाली ठोंबरे म्हणाल्या, मी आज सकाळी 7.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवाजीनगर मेट्रो समोरील पक्ष कार्यालयात गेले होते. मा.अजित दादा पक्ष कार्यालयात आले नव्हतेच. नगरपंचायत,पंचायत समिती उमेदवार मुलाखतीसाठी प्रचंड गर्दी होती.त्यात उद्या गुरुवार निवडणूक उमेदवार अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे दुपार नंतर दादांना भेटण्याचे ठरवून मी नाश्त्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे मा.अजित दादांनी भेट नाकारली,भेटले नाही सदरील बातम्या अत्यंत खोट्या आहेत याची नोंद घ्यावी. मा.अजित दादाची लक्करच भेट घेऊन आपल्याशी नक्की सविस्तर बोलेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लिपिकाद्वारे 15 लाखांची लाच स्वीकारण्यास न्यायाधीशांची संमती, एसीबीने रंगेहात पकडलं; मुंबईच्या माझगाव कोर्टातील प्रकार

    follow whatsapp