बीड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. याबाबतची माहिती महेबुब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'ती' मागणी अखेर मान्य
या प्रकरणात चित्रा वाघ यांनी महेबुब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शेख यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही वाघ हजर झाल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महेबुब शेख यांचे वकील ॲड. अंकुश कांबळे यांनी दिली.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर तरुणीचा छळ केल्याचे आरोप केले होते. वादाची सुरुवात चित्रा वाघ यांनी महेबुब शेख यांच्याबाबत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांमुळे झाली. शेख यांनी या वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि अब्रू धुळीस मिळाल्याचा आरोप करत शिरूर कासार न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने चित्रा वाघ यांना वारंवार समन्स पाठवूनही त्या हजर झाल्या नव्हत्या. अखेर आज न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. या संदर्भात महेबुब शेख यांचे वकील ॲड. अंकुश कांबळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवले, मात्र चित्रा वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केले आहे.”
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात चित्रा वाघ आक्रमक झाल्या होत्या. मात्र, बऱ्याच दिवसांनंतर तरुणीने थेट घुमजाव केला होता. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. विशेष म्हणजे हे प्रकरण तिथेच थांबले नव्हते, तर या प्रकरणी आरोप करणाऱ्या तरुणीने भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणावर चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, “राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नसतात. आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासून मदतच केली होती. आम्हाला जिथे-जिथे तपास यंत्रणा बोलावतील तिथे आम्ही गेलो आणि सहकार्य केलं. असे काही अनुभव आले म्हणून आम्ही काम करणं थांबवलं नाही. आम्ही काम करतच राहिलो. आम्हाला पूर्ण कल्पना होती, ज्या ठिकाणी अशी राजकीय धींड येतात त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवणं स्वाभाविक असतं. त्यामुळे अशा अडचणींना सामोरे जाण्यास आमची तयारी होती.”
विधीमंडळ्यातील वक्तव्यावरुनही दोघांमध्ये झालेला वाद
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल विधिमंडळाच्या अधिवेशनात दिशा सालियान प्रकरणावरून टीका करताना परब यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या, “मी तुमच्यासारखी 56 पायाला बांधून फिरते.” त्यांच्या या विधानानंतर जोरदार वाद निर्माण झाला होता, त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनीही टीका केली होती.
शेख म्हणाले, “चांगल्या घरातील महिला अशा प्रकारची कंबरेखालची भाषा वापरू शकते का? काही लोकांचं असतं, की ते कुठेही गेले तरी तोंडातून फक्त गलिच्छ शब्दच बाहेर पडतात. लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको असं त्यांचं स्वरूप आहे. केवळ भंपकपणा करण्यासाठीच भाजपने त्यांना आमदारकी दिली आहे. अशा वक्तव्यांमुळे सभागृहाचं पावित्र्य राखलं जाणार नाही,” असंही मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











