कल्याण: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, राज्यातील तब्बल 29 महानगरपालिकांमधील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज (22 जानेवारी) पार पडली. नगरविकास खात्याकडून ही सोडत जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदासाठी देखील सोडत जाहीर करण्यात आली.
ADVERTISEMENT
कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौर पद नेमकं कोणासाठी आरक्षित?
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून इथे महापौर नेमका कोणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण त्याआधी महापौर पदासाठी जी सोडत निघते त्यात नेमकं कोणतं आरक्षण जाहीर होतं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. त्यानुसार आज आरक्षण सोडत जाहीर झाली आणि कल्याण-डोंबिवलीत नेमका कोणत्या प्रवर्गाचा महापौर होणार हे स्पष्ट झालं.
जाहीर केलेल्या आरक्षण सोडतीनुसार कल्याण-डोंबिवलीचं महापौर पद हे ST (अनुसुचित जमाती प्रवर्ग - सर्वसाधारण) राखीव झालं आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीचा महापौर हा ST प्रवर्गातील असणार आहे.
| महापालिका | आरक्षण कोणासाठी | कोणासाठी आरक्षित |
| कल्याण-डोंबिवली महापालिका | ST प्रवर्ग | सर्वसाधारण |
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात ही सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय.
महापौर पदाच्या शर्यतीत ही नावं
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महापौर पद हे ST प्रवर्गात सर्वसाधारण म्हणून राखीव झालेला आहे. ज्यानंतर तीन नगरसेवक हे आता महापौर पदाच्या शर्यतीत आले आहेत. जाणून घ्या कोण आहेत हे तीन नगरसेवक.
ADVERTISEMENT











