CM फडणवीसांकडून धनंजय मुंडेंना मोठा हादरा, पालकमंत्र्यांची यादी जाहीर पण...

रोहित गोळे

18 Jan 2025 (अपडेटेड: 18 Jan 2025, 10:22 PM)

Guardian Minister Dhananjay Munde: राज्यातील बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांच्या नावांची यादी अखेर (18 जानेवारी) आज जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का दिला आहे.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नव्या पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर

point

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला धनंजय मुंडेंना मोठा धक्का

point

बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे

मुंबई: राज्याचं नव मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यापासून पालकमंत्री पदाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यातही बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पालकमंत्री पदाची घोषणा ही काहीशी लांबणीवर पडली होती.  अखेर आज (18 जानेवारी) नव्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना मोठा हादरा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सत्ताधारी नेते आणि विरोधक यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात थेट आघाडी उघडली होती. धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करण्यात येऊ नये अशी मागणी ही सातत्याने करण्यात येत होती.

हे ही वाचा>> सर्वात मोठी बातमी! फडणवीस सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, सर्व नावं वाचा एका क्लिकवर

दरम्यान, संपूर्ण प्रकरण लक्षात घेऊन सरकार कोणत्याही पद्धतीने अडचणीत येऊ नये या गोष्टींचा विचार करत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पद दिलं नाही. एवढंच नव्हे तर त्यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व देण्यात आलेलं नाही. त्यामुळे हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पाहा नव्या पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी 

1) गडचिरोली - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
2) ठाणे - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
3) मुंबई शहर - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
4) पुणे - अजित पवार, उपमुख्यमंत्री
5) बीड - अजित पवार, उपमुख्यमंत्री
6) नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
7) अमरावती - चंद्रशेखर बावनकुळे
8) अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे पाटील
9) वाशिम - हसन मुश्रीफ
10) सांगली - चंद्रकांत पाटील
11) नाशिक - गिरीश महाजन
12) पालघर - गणेश नाईक
13) जळगाव - गुलाबराव पाटील
14) यवतमाळ - संजय राठोड
15) मुंबई उपनगर - आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
16) रत्नागिरी - उदय सामंत
17) धुळे - जयकुमार रावल
18) जालना - पंकजा मुंडे
19) नांदेड - अतुल सावे
20 ) चंद्रपूर - अशोक उईके
21) सातारा - शंभुराज देसाई
22) रायगड - आदिती तटकरे
23) लातूर - शिवेंद्रसिंह भोसले
24) नंदूरबार - माणिकराव कोकाटे
25) सोलापूर - जयकुमार गोरे
26) हिंगोली - नरहरी झिरवळ
27) भंडारा - संजय सावकारे
28) छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट
29) धाराशिव - प्रताप सरनाईक
30) बुलढाणा - मकरंद जाधव
31) सिंधुदुर्ग - नितेश राणे
32) अकोला - आकाश फुंडकर
33) गोंदिया - बाबासाहेब पाटील
34) कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
35) गडचिरोली - आशिष जैस्वाल (सह पालकमंत्री)
36) वर्धा - पंकज भोयर
37) परभणी - मेघना बोर्डीकर

 

हे ही वाचा>> Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी! कोर्टात काय घडलं?

 

पालकमंत्र्यांच्या यादीचं परिपत्रक येथून करा डाऊनलोड>> View PDF