malvan nagarparishad election : गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे चर्चेत असलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत (Malavan Nagarparishad Election) मतदानाच्या आदल्या दिवशीच्या रात्रीही मोठा तणाव पाहायला मिळाला. मालवणमध्ये सोमवारी मध्यरात्री झालेल्या नाकाबंदीत पोलिसांना एक कार सापडली. त्या वाहनातून दीड लाख रुपयांची रोख रक्कम मिळाली. ही कार भाजप (BJP)च्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याचे समोर आले. यानंतर शिंदे गटाचे समर्थक आणि निलेश राणे यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केला, ज्यामुळे रात्री उशिरापर्यंत वातावरण चांगलेच तापले.
ADVERTISEMENT
प्राथमिक माहितीप्रमाणे, मध्यरात्री मालवण पोलिसांनी करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या कारमध्ये मोठी रोख रक्कम आढळली. रात्री 10 वाजता प्रचारबंदी लागू झाल्यानंतर काही तासांतच, देवगड भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकार यांच्या MH-07-AS-6960 या कारमधून रोकड मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. गाडी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे हे नंबरप्लेट नसलेली कार घेऊन तेथे पोहोचले आणि प्रकरण दबवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. या दरम्यान शिवसेना (शिंदे गट)चे आमदार निलेश राणे पोलीस ठाण्यात पोहोचले आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय निघणार नसल्याचा कठोर इशारा दिला.
पोलिसांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये ही रोकड सापडली. देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडून ही रक्कम मिळाल्याचा आरोपही निलेश राणे यांनी केला. “मी पोलीस ठाण्यात पोहोचेपर्यंत कोणतीही तक्रार नोंदवली नव्हती. भाजप नेत्यांनी पोलिसांशी सौदा करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
नाकाबंदी दरम्यान स्पेशल स्क्वॉडने गाडी ताब्यात घेतली व त्यांना दीड लाखांची रोकड मिळाली. ही कार भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांची असल्याचे निष्पन्न झाले. प्रचारबंदी रात्री 10 वाजता लागू असताना ही कार पोलिसांच्या हाती रात्री 12 च्या सुमारास लागली. “तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कॅमेरे घेऊन आत येऊ दिले नाही. लाईट बंद करून पोलिस काय करत होते? गाडी पोलीस स्टेशनला 12.10 ला पोहोचली आणि मी 1.15 ला पोहोचेपर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती. पंचनामा नव्हता, निवडणूक अधिकारीही आले नव्हते. मी आल्यानंतरच अधिकारी पोहोचले,” असे निलेश राणे यांनी सांगितले. ज्या गाडीतील लोक प्रकरण दडपण्यासाठी पोहोचले, त्या वाहनाला नंबरप्लेट नव्हती आणि आत भाजपचा गमछा असल्याचा दावा त्यांनी केला. त्या गाडीवरही कारवाई करावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











