राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात, ‘मुख्यमंत्र्यांनी उपटा-उपटी थांबवून…’

मुंबई तक

• 10:22 AM • 26 Jan 2024

मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या वेशीवर येऊन आरक्षण घेतल्याशिवाय आता जाणार नसल्याचे सांगत सरकारला इशारा दिला होता, त्यावरून खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. शेतात जाऊन काही तरी उपटत बसण्यापेक्षा आधी जरांगे पाटलांना भेटून त्यावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Manoj Jarange Patil criticism of MP Sanjay Raut on the issue of Maratha reservation

Manoj Jarange Patil criticism of MP Sanjay Raut on the issue of Maratha reservation

follow google news

Sanjay Raut : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मुंबईच्या वेशीवर आलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा काढला पाहिजे नाही तर मुंबईत हाहाकार माजेल अशी शक्यता वर्तवत खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाला उत्तर द्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ते शेतावर काही तरी उपटत आहेत, ती उपटा उपटी थांबवून जरांगे पाटलांना भेटून त्यावर तोडगा काढावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ‘आरक्षण देण्याची सरकारची मानसिकताच नाही’,राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

संविधानाच्या चिंधड्या

खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही त्यांनी टीका केली आहे. गेल्या दहा वर्षात देशाच्या संविधानाच्या चिंधड्या उडवल्या असून त्याचे रक्षण करायचे असेल तर आगामी निवडणुकीतून हे चित्र बदलायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

हाहाकार माजवणारी घटना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना भेटून तात्काळ भेटले पाहिजे, मात्र मुख्यमंत्री गेल्या दोन दिवसांपासून शेतात गेले आहेत. तिथे जाऊन ते काही तरी उपटत आहेत. मात्र काय उपटत आहेत ते माहिती नाही. पण सध्या त्यांनी ती उपटाउपटी थांबवून त्यांनी जरांगे पाटील यांना भेटून तात्काळ हा प्रश्न सोडवला पाहिजे. कारण त्यांना भेटले नाही तर मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण होईल हाहाकार माजवणारी असेल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

हे ही वाचा >> Maha Vikas Aghadi : रात्रीत फिरला डाव! एक कॉल अन् आंबेडकर झाले तयार

‘महाजन-खोतकर’ हे टपोरी

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मंत्री गिरीश महाजन आणि अर्जुन खोतकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाजन आणि खोतकरांचे हे शिष्टमंडळ नसून ही दोन्ही मंडळी टपोरी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. कारण जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन आणि आमदार अर्जुन खोतकर चर्चा करण्यासाठी गेले होते, त्यावरून त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

    follow whatsapp