'मातोश्री'वरील बैठकीत किती खासदार गैरहजर? 'यांनी' वाढवलं ठाकरेंचं टेन्शन

Matoshree meeting : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत पक्षाच्या 4 खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. 4 खासदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर परभणीचे खासदार संजय जाधव अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी फोनवरुन उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला

Matoshree meeting :

Matoshree meeting :

मुंबई तक

14 Jun 2026 (अपडेटेड: 14 Jun 2026, 04:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मातोश्रीवरील बैठकीत 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित

point

बाकीचे कुठे? महत्त्वाची माहिती समोर

Matoshree meeting :महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली खासदारांची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. मुंबईतील 'मातोश्री' निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत पक्षाच्या खासदारांनी प्रत्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती दर्शवून आपली एकजूट अधोरेखित केली आहे. या बैठकीला कोणते खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते? कोणते खासदार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन चर्चेत सहभागी झाले? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

हेही वाचा : दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याचा राग, विकृत भावाने 44 दिवसात बहिणीला संपवलं!

कोणते खासदार कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित?

अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि संजय दिना पाटील हे चार खासदार मातोश्रीवर प्रत्यक्ष उपस्थित होते, तर चार खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला.  परभणीचे खासदार संजय जाधव हे या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली, 

या बैठकीदरम्यान खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षांतर्गत काही महत्त्वाची निरीक्षणे मांडली. काही खासदारांना सत्ताधारी गटाकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती त्यांनी पक्षप्रमुखांना दिली, परंतु तरीही या सर्व खासदारांनी पक्षाशी आपली एकनिष्ठता आणि एकता कायम असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता आपण शिवसेना (UBT) सोबत ठामपणे उभे असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या चर्चांना या बैठकीतून एक प्रकारे उत्तर देण्यात आले असून, पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत असल्याचे यातून दिसून आले.

हेही वाचा : Personal Finance: घरात असलेलं सोनं न विकताही मिळतील प्रचंड पैसे, हे 'गोल्ड लीजिंग' म्हणजे काय रे भाऊ?

बैठकीला अनुपस्थित असलेल्या किंवा ऑनलाइन जोडल्या गेलेल्या खासदारांची कारणेही अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आली आहेत. खासदार नागेश आष्टीकर हे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना उपस्थित राहणे शक्य झाले नाही. तसेच संजय देशमुखांच्या घरी लग्नकार्य असल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. याशिवाय भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. ओमराजे निंबाळकर यांचे सुपुत्र आजारी असल्याने त्यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत हजेरी लावली. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, ते दोन दिवसांत प्रत्यक्ष भेटून चर्चा करणार आहेत.

मातोश्रीवरील बैठकीबाबत संजय राऊत यांचं ट्वीट 

"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली बैठकीत अरविंद सावंत,  अनिल देसाई , संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे, हे उपस्थित होते.शिवाय ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर,  संजय देशमुख हे खासदार व्हर्चुअली उपस्थित होते. संजय बंडू जाधव (परभणी) यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली, सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत,बैठकीत श्री.आदित्य ठाकरे उपस्थित होते. आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा! जय महाराष्ट्र !", असं संजय राऊत म्हणाले.