'माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार', अमित देशमुखांनी विलासरावांची आठवण सांगितली

राज्यासह देशात काँग्रेसची पडझड सुरु आहे. या पडझडीच्या काळात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुुपुत्र अमित देशमुख यांनी विलासरावांची जुनी आठवण सांगत मी जिथं आहे, तिथं ठिक असल्याचे सांगत मी काँग्रेस सोडणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी घेतली.

Amit Deshmukh

Amit Deshmukh

मुंबई तक

• 10:11 PM • 18 Feb 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

'लढण्यासाठी काँग्रेस अजून जिवंत'

point

'माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार'

point

'काँग्रेस सोडणं हे सामान्य माणसाला पटणारं नाही'

Amit Deshmukh: राज्यात आणि देशात काँग्रेसची पडझड चालू असतानाच लातूरमध्ये मात्र काँग्रेसला (Congress) उभारी देणारी घटना घडली. निमित्त होते, काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक  काँग्रेसच्या दिग्गज आणि तरुण नेत्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजित कदम आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितली काँग्रेस कधी संपणार नाही कारण लढण्यासाठी काँग्रेस अजून जिवंत असल्याचा विश्वासच या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेत्यांनी दिला.

हे वाचलं का?

 काँग्रेस अजून जिवंत

लातूरमध्ये आमदार बंटी पाटील यांनी बोलताना सांगितले की, काँग्रेस अजून संपली नाही कारण लढण्यासाठी काँग्रेस अजून जिवंत आहे. त्यामुळे काँग्रेस संपणार नाही कारण अजून आम्ही लढणार आहे. तर दुसरीकडे विश्वजित कदम यांनी बोलताना सांगितले की, राज्यातील आम्ही तरुण नेते आम्ही सगळे एकसंघ आहोत त्यामुळे जिथं बंटी पाटील आणि अमित देशमुख आहेत तिथं विश्वजित कदम असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. 

हे ही वाचा >> Aditya Thackeray : 'खोटं बोला पण रडून बोला', मुख्यमंत्र्यांवर घणाघात

माझ्या रक्तात काँग्रेस 

तर अमित देशमुख यांनी बोलताना विलासरावांची आठवण सांगत त्यांनी एका किस्सा सांगितला. यावेळी ते म्हणाले की, 'मला तुम्ही काँग्रेस पक्षातून काढून टाकाल पण माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार' असा सवाल विलासराव देशमुख यांनी पत्रकारांना विचारला  होता. त्यामुळे त्यांचे हे वाक्य आजच्या या राजकीय पार्श्वभूमीवर आठवत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी जिथं आहे, तिथं ठिक आहे

अमित देशमुख यांनी बोलताना पुढं सांगितले की, 'आजच्या घडीला माझ्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जात आहेत. मात्र मी त्यांना सांगितलं आहे माध्यमांना की, 'मी जिथं आहे, तिथं ठिक आहे. समाजाशी जी नाळ जोडली गेली आहे. ती नाळ तोडून इकडं तिकडं जाणं हे काही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला पटत नाही. कारण पुन्हा या महाराष्ट्रामध्ये दिवस आणायचे आहेत ते यशवंतराव चव्हाण यांचे असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

    follow whatsapp