Mla Disqualification : “आम्ही ठाकरेंना भेटलेलो; ते म्हणाले, पुन्हा भाजपसोबत सरकार”

योगेश पांडे

• 07:31 AM • 11 Dec 2023

Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांना कात्रीत पकडले. त्याला उत्तर देताना सामंतांनी ठाकरेंनी दिलेले आश्वासन सांगत मोठा खुलासा केला.

shiv sena mlas disqualification case : Shinde mla uday samant cross examined by thackeray faction lawyer.

shiv sena mlas disqualification case : Shinde mla uday samant cross examined by thackeray faction lawyer.

follow google news

Uday Samant Shiv Sena Mla Disqualification : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांची उलटतपासणी झाली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी उदय सामंत यांना एकनाथ शिंदेंबरोबर जाण्यावरून प्रश्न केले. त्यावर महाविकास आघाडीबद्दल नाराज होतो, असं सामंत म्हणाले. पण, त्या मविआ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतात, असा प्रश्न विचारल्यानंतर सामंतांनी मोठा गौप्यस्फोट केला.

हे वाचलं का?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर उदय सामंत यांची उलटतपासणी झाली. यावेळी देवदत्त कामत यांनी काही प्रश्न केले. यात एक मुद्दा होता उदय सामंतांच्या नाराजीचा. महाविकास आघाडीच्या निर्णयाबद्दल नाराज होतो असे सामंत यांनी सांगितले. त्यानंतर देवदत्त कामत यांनी त्यांना कात्रीत पकडलं. त्यावर सामंतांनी पडद्यामागे घडलेला घटनाक्रम सांगितला.

सुनावणीत ठाकरेंच्या वकिलांनी कोणते प्रश्न विचारले आणि सामंत यांनी काय उत्तरं दिली, ते वाचा…

देवदत्त कामत – आपण जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी सुरत आणि गुवाहाटीला जाण्याची जी भूमिका घेतली होती, त्याला आपण पाठिंबा दिला होता का?

उदय सामंत- पाठिंबा नक्कीच दिला होता आणि ती तारीख देखील रेकॉर्डवर आहे.

देवदत्त कामत – तुम्ही जून 2022 मध्ये गुवाहाटीला कोणत्या तारखेला प्रस्थान केले.

उदय सामंत – मला निश्चित आठवत नाही, परंतु 24 किंवा 25 जून 2022 ला गेलो असेन.

हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख होते, पण…’, उदय सामंतांचं सुनावणीला कलाटणी देणार विधान

देवदत्त कामत – विधिमंडळ पक्षाचे कार्य कसे चालावे, याबाबत घटनेमध्ये काही उल्लेख नाही असे आपण पॅरा 9 मध्ये म्हटले आहे असे का म्हंटल आहे?

उदय सामंत – मी मघा उल्लेख केला की, 1999 मध्ये अमेंडमेंट झालेली जी घटना आहे, त्याचा मला पूर्ण अभ्यास नाही परंतु त्यातून मी जे काही वाचू शकलो व त्यातून मला जे काही समजले त्या आधारावर मी असे म्हटले आहे.

देवदत्त कामत – हे खरे आहे का की, पॅरा 10 आणि 11 मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही महाविकास आघाडी (शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी ) बाबत नाराज झाले होते?

उदय सामंत – होय, मी नाराज होतो.

देवदत्त कामत – आपण 2019 ते जून 2022 पर्यंत उच्च तंत्र शिक्षणमंत्री पद भूषवले तरी तुम्ही नाराज होते का?

उदय सामंत – ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी गटनेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उद्धवजींना भेटलो होतो. त्यावेळी आम्हाला असे आश्वासन देण्यात आले होते की, जी निवडणूक आपण नॅचरल अलायन्समध्ये लढलो, भविष्याच्या कालावधीमध्ये तशाच पद्धतीची कार्यवाही होईल. नक्की पुन्हा काही कालावधीनंतर तुम्ही केलेली मागणी मान्य केली जाईल, अशी आमची समजूत काढल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो होतो. पुन्हा काही कालावधीनंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले जाईल, अशा प्रकारचे आश्वासन दिले गेले म्हणून मी मंत्रिमंडळ सामील झालो.

हेही वाचा >> ‘शिंदेंनी नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून आव्हान दिलं?’, शिंदेंच्या आमदाराने सुनावणीत काय दिलं उत्तर?

उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नाकारत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचे कारण उदय सामंत यांनी सुनावणी दरम्यान सांगितले. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते, असा गौप्यस्फोटही केला.

    follow whatsapp