रवींद्र वायकरांची तब्बल 9 तास ED चौकशी, म्हणाले 19 वर्षात फक्त…

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर यांची ईडीने नऊ तास चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये त्यांच्याकडे 19 वर्षाचा अहवाल मागितला असून त्यासाठी त्यांनी वेळ मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

MLA Ravindra Vaikar will be interrogated for nine hours by ED 19 years will report

MLA Ravindra Vaikar will be interrogated for nine hours by ED 19 years will report

मुंबई तक

29 Jan 2024 (अपडेटेड: 29 Jan 2024, 04:19 PM)

follow google news

Ravindra Waikar:  गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे, त्यावरून राजकारण तापलेले असताना आज नऊ तासाच्या ईडी (ED) चौकशीनंतर आमदार रवींद्र वायकरांनी (ravindra waikar) बाहेर येत ही चुकीच्या पद्धतीने आणि दबाव टाकून चौकशी सुरू असल्याचे सांगितले. रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरची कारवाई ही राजकीय दबावापोटी केली जाते आहे. मात्र अशा प्रकारे कोणाचीही चौकशी होऊ नये असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या 9 तासापासून चौकशी करण्यात येत होती. त्यांना मी सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

भूखंड घोटाळा

शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुंबई जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडीकडून नऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीसाठी वायकर सक्तवसुली संचनालयाच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर 500 कोटींच्यी कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी वायकरांची करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सांगितले गेल्या 19 वर्षाचा मी अहवालच दिला असून या 19 वर्षात आम्हाला फक्त 1 कोटी मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निवडीवर ठाकरे कडाडले, ‘लोकशाही संपवण्याच्या दिशेने…’

फक्त 1 कोटीचा फायदा

रवींद्र वायकरांनी ईडी कार्यालयाबाहेर येताच सांगितले की, माझ्यावर 500 कोटीचा आरोप केला गेला आहे. मात्र गेल्या 19 वर्षात 32 ते 34 कोटीचा व्यवसाय झाला आहे. मात्र त्यामध्ये आम्हा पाच पार्टनरांना प्रत्येकी 1 कोटीचा फायदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजकीय दबावापोटी आरोप

त्यामुळे अॅक्टिव्हिटी बिल्डिंगचा फायदा फक्त 1 कोटी 22 लाखाचा फायदा झाला असून जद्या प्रमाणे माझ्यावर आरोप केले जात आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही त्यामुळे आमची चौकशी केली तरी आम्ही त्याला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    follow whatsapp