Raju Patil: ‘रोहित पवारांना ‘ती’ टीप मिळाली असेल’, भाजपबाबत मनसेच्या आमदाराचं मोठं विधान

मिथिलेश गुप्ता

• 04:01 PM • 25 Sep 2023

Raju Patil MNS: रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असेल त्यातून त्यांना टीप मिळाली असेल भाजपबाबत असं विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

mns mls raju patil supported rohit pawar statement that kalyan lok sabha will be contested on bjp symbol

mns mls raju patil supported rohit pawar statement that kalyan lok sabha will be contested on bjp symbol

follow google news

Kalyan Lok Sabha: डोंबिवली: राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी रोहित पवार यांचा तर्क असू शकतो. रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे, त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील त्यातून त्यांना ही टीप मिळाली असेल. माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे की कल्याण लोकसभा भाजपला जाण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात सध्या वाटचाल देखील त्याच दिशेने सुरू आहे. असं वक्तव्य राजू पाटील यांनी यावेळी केलं आहे. (mns mls raju patil supported rohit pawar statement that kalyan lok sabha will be contested on bjp symbol)

हे वाचलं का?

‘भाजपचे मोठे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर या लोकसभा मतदारसंघात बैठका घेतात. त्यामुळे या ठिकाणची उमेदवारी कोणता पक्ष घेईल याबाबत संभ्रम आहे. तसेच पक्षाने आदेश दिल्यास ही लोकसभा मतदारसंघ मनसे लढवेल आणि स्वबळावर लढवेल.’ असंही राजू पाटील यावेळी म्हणाले.

हे ही वाचा>> MLA disqualification case : सुनावणीत काय घडलं? ठाकरेंच्या नेत्याने सांगितली Inside Story

‘जसे गणपती खड्ड्यातून गेले तसे निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल’

दरम्यान, यावेळी बोलताना कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. मनसे आमदार राजू पाटील यांनी खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनासह सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासह भाजपला लक्ष्य केले. ‘प्रशासन गेंड्याच्या कातडीचे झालेत, वन विंडो स्कीम सुरू आहे, या ठिकाणी निवडणुका झाल्या नाहीत. अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यात सत्ताधारी देखील सहभागी असतात त्यामुळे त्यांना कोणी भीक घालत नाही. त्यामुळे जसे गणपती खड्ड्यातून गेले तसे येत्या निवडणुकीत यांना खड्ड्यात टाका तरच आपलं भलं होईल. अशी सडेतोड टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासनावर केली.

हे ही वाचा >> शरद पवार गौतम अदानींना का भेटले? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केला खुलासा

‘या दरम्यान माझ्या वाढदिवसाचे बॅनर लावू नका. एका बॅनरऐवजी निदान एक खड्डा भरा.’ असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलंय. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाली आहे.

    follow whatsapp